धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात; व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये,गुन्हा दाखल होणार

बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घुण हत्या केल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि माणुसकी उभी राहिली. एखाद्या व्यक्तीचा असा अमानुष छळ करुन राक्षसी कृत्य केल्याविरुद्ध आजही सर्वत्र संताप पाहायला मिळत आहे. मात्र, या घटनेनंतर आता बीडमधील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे किंवा त्यांच्या निकटवर्तीयांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्येही अशाच प्रकारे मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यातच, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडूचा देखील एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, तो एका व्यक्तीला शेतात जबर मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे, बीडमधील सर्वच घटनांचं राजकारण होत असून व्हायरल व्हिडिओची वेगळीच प्रथा बीड (Beed) जिल्ह्यात सुरू झाली आहे. तर, या व्हिडिओंवरुन पोलीसही कारवाईला पुढे आले आहेत. आता, धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. बीडचे एसपी नवनीत कावत यांनी याबाबत माहिती दिली.

पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी मधुसूदन हे आहेत, ते चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार दादासाहेब खिंडकर चा मारहाणीचा व्हिडिओ एक वर्षांपूर्वीचा आहे. खिंडकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत त्यांची एबीपी माझाला माहिती दिली. गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीची गरज असते, न्यायालयीन प्रक्रियेत तो महत्त्वाचा भाग असतो, असेही कावत यांनी म्हटले.

काय आहे प्रकरण, कोण आहेत खिंडकर

बीड जिल्ह्यात धनंजय देशमुखांच्या साडूचा म्हणजेच दादासाहेब खिंडकरांचा एक जूना व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला. त्यात धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जुना असून तो वाद कधीच मिटला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, दादासाहेब खिंडकरांवर घरफोडी, पैसे उकळून फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही आता समोर आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=XVQOIK235PC

कोण आहे दादा खिंडकर?

– बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा सरपंच पती दादासाहेब खिंडकर आहे.
– धनंजय देशमुख यांचा तो साडू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तो सक्रिय सहभागी होता.
– दादासाहेब खिंडकर याच्यावर अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे आहेत.
– गेल्या दहा वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे.
– राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कार्यकर्ता आहे.
– सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिंडकर यांच्या गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायत ताब्यात आहे.
– ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडण समोर आले होती

दादासाहेब खिंडकरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेकांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमावर समोर येत आहेत.. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर याने एका तरुणाला बेदम मारहाण करताना आणि एका गाडीची तोडफोड करतानाचा असे दोन व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल होत आहे. हे प्रकरण जुने असले तरी याची  सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे या प्रकरणात दादा खिंडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहेत.

बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण होत आहे. ज्यात दादासाहेब खिंडकर याचा समावेश आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सदरील प्रकरण आपापसात मिटवण्यात आले.

दरम्यान, या व्हिडिओ नंतर सध्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करतानाचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणात देखील दादा खिंडकर घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. याव्यतिरिक्त नागपूर येथे तरुणांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी 420 अंतर्गत गुन्हा नोंद आहे.

हेही वाचा

देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य, मग भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? काँग्रेस खासदाराचा सवाल

अधिक पाहा..

Comments are closed.