संकटकाळात आदित्य ठाकरेंना अनपेक्षित पाठबळ, दिशा सालियन प्रकरणात ‘ते’ दोन नेते मदतीला आले
मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिशाचे (Disha Salian case) वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरुन भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे. अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही. जे तपासात समोर आलं ते सांगतोय, कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते. कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते. मात्र, मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले. औरंगजेबचा विषय शासनासाठी संपला असला. तरी माझासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही. भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत. स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता.
दिशा सालियन प्रकरणावरुन मूळ मुद्दे भरकटवण्याचा प्रयत्न: अमोल मिटकरी
दिशा सालियन प्रकरणात इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली ? इतकी दिरंगाई का केली? राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. राजकीय लोकांनी याला हवा देऊ नये. विरोधक आणि सत्ताधारी यांनी दिशा सालियन प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्नांना बगल देऊ नये. प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. राहुल सोलापूरकरच काय झालं ? जितका फहीम खान दोशी आहे तितकाच या दंगलीला प्रशांत कोरटकर जोशी आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
रोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण
कुठल्याही व्यक्तीने न्याय मागण्याचा प्रयत्न केला असेल तर न्याय मिळाला पाहिजे. न्याय मागत असताना काय खरं घडलं हे कळलं पाहिजे. सुशांत सिंहची आत्महत्या झाली आणि दिशा सालियान यांची घटना घडली होती. सालियन यांच्या वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं, कोणी राजकारण करु नये. मात्र, आता भाजपकडून राजकारण केलं जाईल. टायमिंग फक्त बघून घ्या, भाजपचे लोकं यावर बोलायला सुरुवात करतील. बिहारमध्ये निवडणुका होत्या, तेव्हा तेच केलं होतं. आता बघा चार वर्ष काही काढलं नाही. आदित्य ठाकरेंना मी जवळून ओळखतो. मला वाटतं कितीही काही केलं तरी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही, असा मला विश्वास आहे. एसआयटीचं नेमकं झालं तरी काय? एसआयटी शांत सर्वच शांत आहे. भाजप निवडणूक आहे म्हणून करतंय असं वाटतं. मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे तेच मला वाटतं. सुईच्या टोकाएवढे मला तथ्य वाटत नाही. न्यायालयाने जो निर्णय दिला, जाईल तो सर्वांनाच मान्य असेल.आता भाजप हा मुद्दा मोठा करताना दिसेल. महाराष्ट्राच्या जोरावर बिहारच्या निवडणुका लढवणार आहात का? यात महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=hvnwx_e2t74
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.