कोकणातील एकमेव जागेचा तिढा कायम; तडजोडीवर मंत्री भरत गोगावलेंचं चेकमेट, पालकमंत्री पद अन् विधान
कोकण: कोकणातील विधान परिषदेच्या जागेवर सुरू असलेला तिढा सुटला असल्याच्या चर्चा रंगू लागल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मात्र मला याबाबत अजिबात काहीच माहित नसल्याच म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कोकणातील विधान परिषदेची जागा सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना मिळणार तर रायगडचा पालकमंत्री पद भरत गोगावले यांना मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.(Vidhan Parishad Election 2026 Raigad) अशी कोणतीच डिल झाली नसल्याच गोगावले यांनी स्पष्ट म्हटले आहे. हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि चर्चा झालेली नाही अस सांगताना चर्चा शिंदे साहेब आणि वरीष्ठ पातळीवर झाली असेल तर मला त्या बद्दल माहिती नाही. शिंदे साहेबांनी पालक मंत्री पदासाठी प्रयत्न केलेत त्यामुळे जो निर्णय शिंदे साहेब घेतील तो आम्हाला मान्य असेल असं गोगावले म्हणाले.
आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे आम्ही त्या जागेवर मागणी करणे साहजिकच आहे. मात्र एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल असे देखील गोगावले म्हणाले आहेत. त्यामुळे या जागेचा तिढा नक्की सुटलाय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले या जागेवर निवडणूक लढवण्यास ठाम आहेत, तर तिकडे तिकडे राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे सुद्धा ठाम आहेत, मात्र हा तिढा कायम राहिल्यास पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला या आधी देखील अनेक वेळा फसवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, काल महाड येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत शिवसेनिकांनी एकमतांना विकास गोगावले यांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह केला केला आहे.(Vidhan Parishad Election 2026 Raigad)
Vidhan Parishad Election 2026 Raigad : काय म्हणालेत भरत गोगावले?
एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. ते आमचे नेते आहेत. आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला मानणारी लोक आहोत मागणी सगळ्यांचीच आहे, पूर्ण कोकणाची मागणी आहे, शिवसेनेलाही ही जागा मिळावी, कारण शिवसेनेचे सदस्य संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांनीही मागणी करणं चुकीचं नाही पण निर्णय घेणार हे आमचे नेते ठरवतील, तिन्ही पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, तर विधान परिषद पद अनिकेत तटकरे यांना तर पालकमंत्री पद भरत गोगावले यांना देण्याची चर्चा आहे, या प्रश्नावर उत्तर देताना गोगावले म्हणाले, मला याबद्दल काही माहिती नाही. मी उज्जैनला गेलो होतो, त्यामुळे ही चर्चा तर मी आज तुमच्याकडे नाही आमची तशी काही चर्चा झाली नाही, माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही, त्यामुळे मला नक्की सांगता येणार नाही. सर्व गोष्टींवर निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील, आम्ही त्यांच्या नेतृत्वाला मानतो, तो जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू, असंही गोगावले म्हणाले आहेत.
Vidhan Parishad Election 2026 Raigad : अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा
रायगडमध्ये विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026 Raigad) जागेसाठी मोठी राजकीय डील झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या डीलमुळे आता सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांचा विधानपरिषदेसाठीचा रस्ता मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ही नवी खेळी खेळल्याचंही बोललं जात आहे. रायगडच्या जागेवर दावा करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षासमोर एक नवा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे.(Vidhan Parishad Election 2026 Raigad)
रायगडची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंसाठी सोडण्यास तयार आहेत. मात्र त्या बदल्यात रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेकडून मागितल्याची चर्चा आहे. मागील सव्वा वर्षापासून नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद हे रिक्त आहे, शिवसेनेकडून भरत गोगावले यांच्यासाठी तर, राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्यासाठी आग्रह धरण्यात येत होता. मात्र, या निवडणूकीच्या निमित्ताने या वादावरच तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. (Vidhan Parishad Election 2026 Raigad)
आणखी वाचा
Comments are closed.