तुम्ही आम्हाला काय तुडवणार, शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवणार नाहीत; एकनाथ शिदेंचा इशारा
मुंबई : रात्री खासदारांना शिव्या द्यायच्या आणि सकाळी कौतुक करायचं, हे असं चालतं का? सेनापतीने घरात बसून चालत नाही, त्याने पुढे येऊन लढावं लागतं. हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे, कुणावर संकट आलं तर पुढे मी असेन, असं एकनाथ शिंदे म्हणाले. हे काय आम्हाला चॅलेंज देणार. आता म्हणतात तुडवा. हिंमत असेल तर समोर या. तुडवायला पाय लागतात, तुम्ही आला तर हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. शिवसेनेचा 60 वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. हा एकनाथ शिंदे तुमच्यावर संकट आलं तर छातीचा कोट करून लढेल. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो, ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “रक्ताचे नाते सांगून, कोणी वारस होत नाही, सात बारवर नाव लावून कोणी वारस होत नाही, शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, शिवसेना म्हणजे काळजाचा तुकडा आहे. बाळासाहेबांच्या हयातीत तुम्ही त्यांना त्रास देत होता. बाळासाहेब गेल्यानंतर त्यांना तिरस्कार असलेल्या लोकांचा पुरस्कार तुम्ही केला. शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली तर ती राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कोणी फोडली तर ती काँग्रेसने. ते यांना पुढे करतात आणि ज्याने शिवसेनेचा भगवा यातून मुक्त केला त्याच्यावर टीका करतात.”
एकनाथ शिंदे म्हणाले की, “आमदार मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून संधी देणार नाही, त्याने जर कर्तृत्व केलं, काम केलं तर त्याकडे दुर्लक्षही करणार नाही. पक्ष म्हणजे आमदार-खासदार नाही, मंत्री नाही, तर पक्ष म्हणजे शिवसैनिक आहे. त्यांना जपलं पाहिजे. निवडणुकीनंतरही कार्यकर्ता हा आवडताच असला पाहिजे. कार्यकर्ता वाढला पाहिजे, तरच पक्ष वाढेल.”
माझ्याकडे वशिला लागत नाही, पैसे लागत नाही, मर्सिडीस लागत नाही, माझे लक्ष सगळ्यांकडे असते. त्यामुळेच आपण भीमाच्या पोरीला, ज्योती वाघमारेला राज्यसभा खासदार केलं. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाला आपण संधी देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आनंद दिघे पाठीशी होते. त्यावेळी डोंगराएवढं दुःख होतं. आनंद दिघे आणि बाळासाहेब सोडून गेले. आज माझे नेते, कार्यकर्ते हेच माझे कुटुंब आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवी आणि माझ्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न काही लोक करतात. पण आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलो नाही. कुछ लोग छुप छुप कर उन्हे बताते है, वो सब आकर हमें बताते है, असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा:
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Comments are closed.