एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; 3-4 मंत्र्यांचे टोचले कान, कुणाला मंत्रिपदाची संधी?

मराठी Shivsena: शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन पक्षात बांधणी केली जाणार आहे.

कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यावरून एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच मंत्रीमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याचे कळते. (मराठी Shivsena)

एकनाथ शिंदेंच्या महत्वाच्या सूचना- (मराठी Shivsena)

निवडणुकीत मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो, का पडलो याची कारण मीमासा करण्याच्या सूचनाही दिलेल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे.

कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? (Maharashtra Municipal Corporation Election Result 2026)

एकनाथ शिंदेंनी याबाबत पालिका निवडणूकीपूर्वीच मंत्र्यांना संकेत दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही सेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस्ट टेस्ट होती असे बोलले जाते. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवून शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार असल्याचं समोर येत आहे. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरीही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे.

शिंदेंना मुंबईत फटका का बसला? (Why did मराठी lose in BMC?)

पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पक्षातील मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. मात्र ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाहीत. त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत, शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने मेरिटवर प्रत्येक जागेवर चर्चा करून त्यातील फक्त 90 जागा शिवसेनेला दिला. या जागा देतानाही भाजपने भविष्यातील त्या जागांवरचा क्लेम लक्षात ठेवूनच त्या जागा शिवसेनेला सोडल्या, यातही शिंदेंनी अनेक जागा घराणेशाही म्हणून वाटल्या, यात तुकाराम काते वगळता इतर नेत्यांना त्यांच्या घरातील व्यक्ती निवडणूनच आणता आला नाही. यात माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं, खासदार रविंद्र वायकर यांची मुलगी, राहुल शेवाळे यांची भावजय, आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभव पत्करावा लागला. मग काय म्हणून शिंदेंनी या नेत्यांकडे पाहून त्यांच्या मुलांना तिकीट दिल्या, असे प्रश्न स्थानिक कार्यकर्ता खासगीत उपस्थित करतात. ऐन निवडणुकीत शिंदेना जागा वाटप चर्चा आणि युतीत कल्याण डोबिंवली, ठाणे अंबरनाथ इथेच बांधून ठेवले. याचाच प्रमुख फटका मुंबईत बसल्याचं बोललं जात आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल

आणखी वाचा

Comments are closed.