तुकाराम मुंढेंचे धडाधड छापे, खटाखट कारवाई, मंत्री नरहरी झिरवळांनाही राहवलं नाही, बर्थडेच्या दिव
नरहरी झिरवाळ नाशिक : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून चा चार्ज स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अन्नातील भेसळीविरोधात (Food Adulteration) राज्यभर कारवाईचा तीव्र धडाका लावला आहे. एफडीएच्या पथकाने राज्यव्यारात्री राबवलेल्या या कारवाईच्या सत्रेमुळे भेसळीकरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर या कारवाईच नागरिकांकडून स्वागत आहे केलं जात आहे. या सर्व बाजूभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मंत्री नरहरी झिरवाल हे देखील आता ॲक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. अन्न औषध प्रशासन विभागाचे (Food and Drug Administration Minister) मंत्री नरहरी झिरवाळ यांni नाशिक शहरातील दूध बाजारात धडक कारवाई करत तपासणी केली आहे.
Narhari Jhirwal : नाशिक शहरातल्या दूध बाजारात छापा, नरहरी झिरवाळ म्हणाले…
नाशिक शहरातल्या दूध बाजारात नरहरी झिरवाळ यांनी छापा टाकला. यावेळी झिरवाळ यांच्याकडून दूध बाजारात विक्री होणाऱ्या दुधाची तपासणी करण्यात आली आहे. विशिष्ट म्हणजे नरहरी झिरवाळ यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार यांना श्रद्धांजली त्यांनी वाहिली आहे. अजित पवार ज्या प्रामाणे सकाळी उठून काम करत होते, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून नरहरी झिरवाळ यांनी आज सकाळपासून कामाला सुरुवात केली आहे. ज्या दोन ते तीन ठिकाणी त्यांनी छापा मारला आहे, त्या ठिकाणी त्यांना भेसळ आढळून आलेली नाही. कुठल्याही त्रुटी प्राथमिक तपासणीमध्ये आढळून आल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
FDA Appeal : दूधजन्य पदार्थांच्या साठवणुकीबाबत एफडीएचे आवाहन
मुंबई आणि परिसरातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, एफडीएने सर्व उत्पादक आणि व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक ही स्वच्छ जागी आणि योग्य तापमान नियंत्रित ठेवूनच करावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या नव्या कारवाईतून मिळाले आहेत.
FDA Action: अवैध गॅस व डिझेल चोरीचा पर्दाफाश; धुळे जिल्ह्यात 1.56 कोटींचा मुद्देमाल जप्त
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने दोन दिवस गुप्त पाळत ठेवून गुजरात-धुळे महामार्गावर अवैधरीत्या गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. या कारवाईत भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर, एचपी कंपनीचा डिझेल टँकर, १४० व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच अन्य साहित्य असा सुमारे १ कोटी ५५ लाख ९५ हजार ११४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ, सुरत-धुळे महामार्गावरील अन्नपूर्णा ढाब्याच्या मागे व पार्श्वनाथ ढाब्यालगत करण्यात आली. राज्य दक्षता पथकाने दोन दिवस पाळत ठेवून गॅस व डिझेल टँकरमधून इंधनाची अवैध चोरी सुरू असताना छापा टाकला.
कारवाईदरम्यान गुजरातहून जळगावकडे जाणारा जीजे-०६ एझेड-४४३० क्रमांकाचा एलपीजी गॅस टँकर, त्यातील १७.४२ मेट्रिक टन एलपीजी गॅस, जीजे-१२ बीझेड-७९९९ क्रमांकाचा डिझेल टँकर, त्यातील ३५ किलोलीटर डिझेल, तसेच बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, १३० व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजनकाटे आणि ड्रममधील डिझेल साठा जप्त करण्यात आला.
ही बातमी वाचा:
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Comments are closed.