वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी देत सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग
गोंदिया : जिल्ह्यातील देवरी (गोंदिया) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी अद्यापही फरार असल्याने पोलिसांच्या (Police) कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील सेवानिवृत प्राचार्याने एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना 28 एप्रिल रोजी घडली होती. या घटनेला 6 दिवस लोटूनही आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीच्या शोधत पोलीस पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली. तसेच, आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत देवरी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी सेवानिवृत्त प्राचार्याच्या घरी भाड्याने वसतिगृह असून तिथेच राहात होती.
राज्यात महिला अत्याचार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे, गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली असून भोंदूबाबांकडून होत असलेल्या अत्याचाराने घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. त्यातच, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना देखील सामाजिक मुल्यांचं झालेलं अध:पतन दर्शवत आहे. त्यातच, गोंदिया जिल्ह्यात एका सेवानिवृत्त प्राचार्याने 15 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याने खळबळ आणि संताप व्यक्त होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे एका सेवानिवृत्त प्राचार्याने त्याच्याच घरी भाड्याने असलेल्या वस्तीगृहात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला. “माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस मारून दे या बहाण्याने आरोपीने जबरस्ती हात पकडून रूममध्ये नेलं आणि पैशाचे आमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार मुलीने दिली आहे. याप्रकरणी, देवरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून सेवानिवृत्त प्राचार्य काशिनाथ शहारे यांच्या विरुद्ध पोस्को (POCSO)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काशिनाथ शहारे हा गेल्या 6 दिवसापासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले असून लवकरच आरोपीला अटक होईल, असेही पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.