सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; सपकाळांचा शिंदे हल्लाबोल
Harshvardhan Sapkal on मराठी: हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही आणि या सरकारमधील मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उलट सरकारला जाब विचारणं यातच खरं महाराष्ट्र हित असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोही असल्याचे म्हटले होते. यानंतर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्र द्रोह नाही
हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्र द्रोह नाही, महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं, निकृष्ट काम करणं आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह आहे. हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही आणि या सरकारमधील मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. उलट सरकारला जाब विचारणं यातच खरं महाराष्ट्र हित आहे.
महाराष्ट्र द्रोहीच आहेत, राज्याचे दुश्मन आहेत
दुसरीकडे, एकनाथ शिंदे आज विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही, विदेशातून लोक येत आहेत. महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपल्या विरोधी पक्षातील सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील ते करत आहेत. खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करत आहेत, त्यांना आपण काय म्हणणार? आता इथं महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्र द्रोहीच आहेत. हे राज्याचे दुश्मन आहेत. कुठलाही प्रकल्प बदनाम झाला, तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही, मंत्र्यांची नाही, त्यामुळे शेवटी तारतम्य बाळगलं पाहिजे.
मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल (Engineering Marvel) आहे. मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही, वाहतूक सुरू झाली. काही लोकांनी जे काही आकाश पाताळ एक केलं की मिसिंग लिंक पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली? किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26 टक्के झाली. मंजूर रकमेच्या 10 टक्क्यांपेक्षा देखील कमी, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारातुमचं कोल्हापूर सगळंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी एक कोटी रुपयांचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे असे शिंदे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Comments are closed.