कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी रुपये दिले, तुमचा उत्सव आहे, पण एवढा निधी कशाला? इम्तियाज जलीलांचा

Imtiaz Jaleel: कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela) 25 हजार कोटी रुपयांचा निधी दिला गेला. ठीक आहे, तुमचा उत्सव आहे. पण एवढा निधी कशाला? त्यात देशात किती शाळा आणि हॉस्पिटल होतील, अशी टीका एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्य सरकारवर केलीय. तर मी फडणवीस यांचे इना, एकनाथ शिंदे यांचे मीना, अजित पवार यांचे डिका नाव ठेवले आहे. अजित पवार यांना मतदान म्हणजे भाजपला मतदान, असा घणाघात देखील त्यांनी केलाय. तसेच, बिहारमध्ये आपले पाच आमदार निवडून आले. काँग्रेसवाले म्हणाले हैदराबादवरून ओवैसी येत आहेत. तुमची मम्मी कुठून आली? असा सवाल विचारत त्यांनी काँग्रेससह सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधलाय.  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik News) एमआयएमची (MIM) जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

इम्तियाज जलील म्हणाले की, मी इथे मोटार सायकलवर पोहचलो आहे. तपोवनात  झाडे कापले जात आहेत. धर्माच्या नावाखाली हजारो झाडे कापली जात आहेत. कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी रुपये निधी दिला गेला. ठीक आहे, तुमचा उत्सव आहे. पण एवढा निधी कशाला? मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जमीन दिली होती. या राज्यात काही लोक होते जे सर्व धर्म आणि समाजासोबत चालत होते. यात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे होते. श्रद्धांजली द्यायची असेल तर हॉस्पिटल किंवा शाळा बनवा, स्मारक नाही. भाजपच्या नेत्याचं जे स्मारक बनवलं जात होतं. मी त्या विरोधात कोर्टात गेलो, ज्या ठिकाणी स्मारक होत आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवा असे सांगितले. ज्या ठिकाणी भाजप नेत्याचे स्मारक बनत होते, आता त्या ठिकाणी चारशे बेडचे हॉस्पिटल आहे. फडणवीस ,अजित पवार ,एकनाथ शिंदे हा देश सर्व धर्म समभाव आहे. जे 25 हजार कोटी रुपये देत आहे. त्यात देशात किती शाळा आणि हॉस्पिटल होतील, असे म्हणत त्यांनी कुंभमेळ्याच्या निधीवरून राज्य सरकारवर टीका केली.

Imtiaz Jaleel: ज्या शब्दात बोलणार, त्या शब्दात उत्तर देणार

इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, आपल्याला शिक्षणावर लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला लक्ष्य केले जात आहे. रोज दर्गा, मशिदी लक्ष्य केल्या जात आहेत. रोज एकाचे घर कुठल्या न कुठल्या राज्यात पाडले जात आहे. या देशात आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. भाजपने ठरवले आहे की, आपल्याला यांच्याशी काही घेणे देणे नाही. रोज एक मंत्री आपल्या धर्मावर टोपी आणि दाढीवर बोलत आहे. 1947 मध्ये आपल्या पूर्वजांना विचारले कुठे जाणार? आपण इथे जन्मलो असे सांगितले. कोणी काही बोलले तर आपल्याला ऐकावे लागत आहे. आपण एवढ्या वर्षापासून ऐकत आहे. पण, आता ज्या शब्दात बोलणार त्या शब्दात उत्तर देणार, असा इशारा त्यांनी दिला.

Imtiaz Jaleel: पुढच्या वेळी इथे हेलिकॅप्टरमध्ये येईल

राज्यात लोढा नावाचा एक मंत्री आहे. त्याचा एक फ्लॅट करोडमध्ये जातो. त्याने वक्तव्य केले ज्यांना कोणाला कुराण वाचायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जा. ज्या दिवशी त्याने वक्तव्य केलं, त्या दिवशी त्याचा बाप बिहारमध्ये प्रचार करत होता. त्याच दिवशी त्याला उत्तर दिले असते.  एक दिवशी मी कोल्हापूर गेलो. दुसऱ्या दिवशी अहिल्यानगरला जाणार तेव्हा जेवढे हिंदुत्ववादी संघटन आहेत, भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीने पण यांना येऊ देऊ नका, असे सांगितले. मी गेलो आणि म्हणालो माझं काय वाकडं करता पाहू. मी कोणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा नाही. मी पार्लमेंटमध्ये  उभा राहतो तर इथे ओरडणारे काय? मी पोलिसांना सांगत आहे, जेवढे थांबवता येईल तेवढे थांबवा. आज इथे पहिल्यांदा आलोय. इथून पुढे येत राहील. पुढच्या वेळी इथे हेलिकॅप्टरमध्ये येईल, असा हल्लाबोल देखील इम्तियाज जलील यांनी केला.

Imtiaz Jaleel: तुमची मम्मी कुठून आली?

इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, येणाऱ्या दिवसात मनपा निवडणूक आहे. बिहारमध्ये आपले पाच आमदार निवडून आले. काँग्रेसवाले म्हणाले हैदराबादवरून ओवैसी येत आहेत. तुमची मम्मी कुठून आली? असे म्हणत त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. इम्तियाज जलील लोकसभा, विधानसभा हरला पण यांच्यात हरवण्याची ताकद नव्हती. आपल्याच गद्दारांनी आपल्याला पाडले. आता तर उद्धव ठाकरेंना पण सेक्युलर नेता मानत आहे. पण, याच उद्धव ठाकरेंनी सहा डिसेंबरला जल्लोष केला, त्या दिवशी त्यांनी सांगितले आम्ही बावरी पडली. काही मुस्लिम भाजपमध्ये आहेत. एकनाथ शिंदे सोबत आहे. हेच एकनाथ शिंदे ज्यांनी आपल्या देवावर बोलले, त्याच आश्रमात जाऊन त्यांनी केसाला पण धक्का लागू देणार नाही असे सांगितले होते, असे म्हणत त्यांनी रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे सिन्नर येथील एका  कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, यावरून एकनाथ शिंदेंवर टीका केली.

Imtiaz Jaleel: अजित पवार यांना मतदान म्हणजे भाजपला मतदान

रोज आपल्यावर बोलत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. आपण काही बोललो तर कारवाई होते. दलित, आदिवासी समाजाचे अनेक जण जेलमध्ये आहेत. मुंबई आणि राज्यातील निवडणुका सुरू होत्या. ते हे एकत्र होते. पण, त्यात भाजपचा मुंबई अध्यक्ष म्हणत होता की, नवाब मलिकला सोबत घेणार नाही.  मी फडणवीस ईना यांचे, एकनाथ शिंदे यांचे मीना, अजित पवार यांचे डीका नाव ठेवले आहे. अजित पवार यांना मतदान म्हणजे भाजपला मतदान, असा घणाघात देखील इम्तियाज जलील यांनी केला.

आणखी वाचा

19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप! मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

आणखी वाचा

Comments are closed.