एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर : जयकुमार गोरे
Jaykumar Gore सोलापूर : यंदा राज्यावर अल निनोचे संकट (El Nino effect on Monsoon 2026) असल्याने पाऊस अपेक्षेपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. अशावेळी उजनी धरणात असलेले पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केले आहे. त्यामुळेच यंदा उन्हाळ्यात एकच आवर्तन देण्याचे सध्या ठरविण्यात आले असून पाण्याची उपलब्धता पाहून दुसऱ्या आवर्तनाचा विचार केला जाईल, असे गोरे यांनी सांगितले आहे. सध्या उजनीच्या मुख्य कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकाची काळजी मिटणार आहे. दरम्यानसोलापूरला दुहेरी पाईपलाईन झाल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीद्वारे सोडण्यात येणारे पाणी आता बंद झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असून यासाठी येत्या एक-दोन दिवसात भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन ही गोरे यांनी दिले आहे.
Water Crisis : दुष्काळाचे संकट पाहता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
अशातचगेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी उजनी धरणात चांगला पाणीसाठा शिल्लक असला तरी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून शेतकरी, उद्योजक आणि नागरिकांनी दुष्काळाचे संकट पाहता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
Jaykumar Gore : संभाव्य दुष्काळाचे संकट, प्रशासनाकडून पाण्याचे आधीच नियोजन
उजनीत सध्या 17 टक्के एवढा पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेने परिस्थिती खूप चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. यातच आता सोलापूरला दुहेरी पाईपलाईनमुळे धरणातील जवळपास 12 टीएमसी एवढे पाणी वाचले असल्याचा दिलासाही मिळाल्याचे गोरे यांनी सांगितले. मात्र अल निनोमुळे संभाव्य दुष्काळाचे संकट येणार असल्याने प्रशासनाने पाण्याचे आधीच नियोजन केले असल्याचा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण; पुढील चार दिवसांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने पुढील चार दिवसांत हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजूवर परिमाण होण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना आंबा, वेचणी केलेल्या किंवा वाळत घातलेल्या काजु बिया, कडधान्ये, वाळत घातलेली सुपारी इत्यादी सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. भात आणि भुईमुग पिके काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.