माहेरी आलेल्या 25 वर्षीय मुलीला बापाने संपवलं; किरकोळ कारणावरुन बाप-लेकीचा वाद, कल्याणमधील घटने
कल्याण क्राईम न्यूज : कल्याण (Kalyan) पश्चिम येथील दुधनाका परिसरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 50 वर्षीय बापानेच आपल्या 25 वर्षीय पोटच्या विवाहित मुलीची (Married Daughter) टोकदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कल्याण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bazarpeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायत्री शिंदे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. गायत्री ही काही दिवसांपूर्वीच दुधनाका परिसरात तिचे वडील विनोद वसईकर (वय 50) यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. मात्र, काही अज्ञात कारणावरून वडील विनोद आणि मुलगी गायत्री यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या विनोद वसईकर याने रागाच्या भरात घरात असलेल्या एका टोकदार हत्याराने थेट गायत्रीच्या कपाळावर गंभीर वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, अतिरक्तस्रावामुळे गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. पोटच्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर आरोपी पिता विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाला.
Kalyan Crime News: आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना
या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी 50 वर्षीय आरोपी पिता विनोद वसईकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी बाजारपेठ पोलिसांची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली असून, वेगवेगळ्या भागात त्याचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपीला अटक केल्यानंतरच खरा प्रकार समोर येणार आहे. मात्र, या घटनेमुळे कल्याणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.