पतीला वाचवण्यासाठी पत्नीने स्वतःची किडनी दिली, मात्र फॅमिली डॉक्टरच फसवणुकीचा सूत्रधार निघाला

कल्याण क्राईम न्यूज : पतीचे प्राण वाचवण्यासाठी एका पत्नीने स्वतःची किडनी दिली, पण नशिबाने साथ दिली नाही. याच हतबलतेचा फायदा घेत काही नराधमांनी या कुटुंबाला लुबाडल्याचा (Kidney transplant fraud) धक्कादायक प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. स्वतःच्या फॅमिली डॉक्टरनेच किडनी ट्रान्सफरचे आमिष दाखवून एका महिलेकडून तब्बल 31 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी डॉक्टरसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचे धागेदोरे ओडिसा राज्यापर्यंत पोहोचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी डॉक्टर अजूनही उजळ माथ्याने क्लिनिक चालवत असून अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसाला यश आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नेमकं प्रकरण काय? (उल्हासनगर किडनी ट्रान्सप्लांट फसवणूक)

उल्हासनगरच्या चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दिपाली चव्हाण यांचा संघर्ष पाहून कोणाचेही डोळे ओलावतील. पतीची किडनी खराब झाल्याने दिपाली यांनी स्वतःची किडनी पतीला दान केली. मात्र, दुर्दैवाने त्यात इन्फेक्शन झाले आणि पती पुन्हा मृत्यूशी झुंज देऊ लागले. याच वेळी मदतीला धावून येण्याऐवजी, त्यांच्या फॅमिली डॉक्टरनेच त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला. दिपाली यांचे फॅमिली डॉक्टर गौरव धर्मा नायर यांनी आपल्या ओळखीने किडनी डोनर मिळवून देतो आणि ऑपरेशन करून देतो, असे आमिष दाखवले. यासाठी त्यांनी मोसमी बिस्वास, जयदेव बिस्वास आणि इतर साथीदारांची ओळख करून दिली. या टोळीने 2 जुलै 2025 पासून 7 मार्च 2026 दरम्यान दिपाली यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 31 लाख 67 हजार 860 रुपये उकळले.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल; मोठ्या किडनी रॅकेटचा संशय (Kalyan Crime News)

दरम्यानलाखो रुपये देऊनही पतीचे ऑपरेशन झाले नाही आणि डोनरही मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिपाली यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने डॉक्टरसह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आता ओडिसातील भुवनेश्वरपर्यंत पोहोचला असून, तिथेही एका रुग्णालयात व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊनही मुख्य सूत्रधार असलेला डॉक्टर अजूनही आपल्या क्लिनिकमध्ये रुग्णांना तपासतोय. पोलिसांना अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तपासाचे धागेदोरे ओडिसापर्यंत पोहोचले; विविध ठिकाणी आर्थिक व्यवहार उघड (Kidney Transplant Fraud)

या प्रकरणामागे मोठे किडनी रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत असून, इतर नागरिकांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली का याचा तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांकडून केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Solapur Crime Manohar Mama: मणक्याचा त्रास दूर करायला पांढऱ्या डब्यात 50 हजारांची हळद दिली, व्यावसायिकाच्या गळ्यात मंतरलेला धागा बांधला, मनोहर मामाचा तुरुंगातला मुक्काम वाढला

आणखी वाचा

Comments are closed.