बड्या अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढलं; फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नाजूक क्षणांचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलि
पुणे: काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या हनी ट्रॅप संदभर्भातील वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. राज्यात समोर आलेल्या ७२ अधिकाऱ्यांच्या आणि हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली. या हनी ट्रॅपमध्ये आजी-माजी मंत्री सरकारी अधिकारी आणि नेत्यांची नाव असल्याची चर्चा झाली, त्याचबरोबर याचं मूळ कनेक्शन नाशिकशी असल्याचं समोर आलं, दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. तर नाना पटोले यांनी पेन ड्राईव्ह दाखवत सरकारला धारेवर धरलं. त्यावर अधिवेशनाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी ना हनी ना ट्रॅप म्हणत सत्ताधाऱ्यांकडून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात महत्त्वाचं कनेक्शन भाजप नेता असलेला प्रफुल्ल लोढा असल्याची चर्चा झाली. लोढाच्या माध्यमातून अनेकांना अडकवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही आमदार आणि खासदारांना हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच पळवण्यात आल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
हनीट्रॅपचं प्रकरण चर्चेत कसं आलं?
15 जुलै रोजी एक बातमी आली होती, यामध्ये राज्यातील 72 सरकारी अधिकारी काही नेते हे हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली होती. यामध्ये राज्यातील सात क्लास वन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी, तीन पोलीस आयुक्त, काही महसूल अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह आजी-माजी मंत्री यांचा समावेश असल्याची यामध्ये माहिती देण्यात आली होती. नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका नेत्यांना या प्रकरणाची माहिती दिली होती, नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता. एक महिला विविध अधिकाऱ्यांना विविध कारणं सांगत भेटायची त्यांना आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यानंतर खंडणीची मागणी करायची, असा हा सगळा प्रकार होता. याबाबत एका अधिकाऱ्याच्या पत्नीने आणि इतर काही अधिकाऱ्यांनी स्वतः पोलिसात तक्रार दिल्याचं 15 जुलैच्या या बातमीमध्ये सांगण्यात आलं होतं. त्यानंतर या ट्रॅपचा पॅटर्न समोर यायला सुरुवात झाली.
प्रकरणाची सुरूवात कधी झाली?
या प्रकरणाची सुरुवात 2016 मध्ये झाली होती, त्यावेळी एका महिलेने आपण क्राईम ब्रँचमध्ये अधिकारी असल्याचं सांगत एका व्यावसायिकाला 40 लाख रुपयांचा गंडा घातला होता, त्यावेळी त्या व्यवसायिकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी या महिलेने पैसे दिले नाहीस तर तुझ्यावर कारवाई करेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर या व्यवसायिकाने या महिलेची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर या विभागाच्या मार्फत कारवाई झाली आणि संबंधित महिलेला अटक केली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार ही महिला कोणती अधिकारी नसून एक होमगार्ड असल्याचा समोर आलं होतं. त्यावेळी त्या महिलेची होमगार्ड पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
हे प्रकरण तिथेच संपलं. मात्र, या महिलेची नोकरी गेली तरी ती थांबली नाही. तीने या गोष्टीचा वापर करायला सुरुवात केली आणि हनी ट्रॅपचा खेळ सुरू झाला. होमगार्ड असताना तिची अनेक पोलिसांची ओळख झाली होती. या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायला तिने सुरुवात केली. मी विधवा आहे आणि माझी नोकरी गेल्यामुळे माझं पोट भरणं मला अवघड जातंय, माझ्या भावाला नोकरी लावून द्या अशा काही गोष्टी सांगत संबंधित अधिकाऱ्यांना भावनिक रित्या ब्लॅकमेल करणं सुरू केलं. या पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे सेल्फी ती इतर अधिकाऱ्यांना दाखवत होती अशा प्रकारे ती अधिकाऱ्यांचा विश्वास मिळवत होती.
या बड्या अधिकाऱ्यांचे नंबर घेऊन त्यांच्याशी ती ओळख वाढवत होती, त्यानंतर ती त्यांच्याशी फोनवर बोलत होती, चॅट करत होती संबंधित अधिकाऱ्यांना तिने फोटोही पाठवले होते आणि समोरच्या अधिकारी तिच्या जाळ्यात सापडत गेले. समोरचा अधिकारी आपल्या जाळ्यात फसला हे तिला कळल्यानंतर ती महिला नाशिकच्या मुंबई नाका परिसरातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना भेटायला बोलवायची. त्या हॉटेलच्या मालकासोबत तिचं साटंलोटं होतं, या हॉटेलमध्ये आल्यानंतर संबंधित महिलेचे आणि अधिकाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जायचे, हे व्हिडिओ आणि आधी झालेली व्हाट्सअप चॅट व्हायरल करण्याची धमकी देत या अधिकाऱ्यांकडून आणि संबंधितांकडून पैसे मागायला सुरुवात केली, काही अधिकाऱ्यांनी बदनामी आणि नोकरी जाण्याच्या भीतीने या महिलेल्या पैसे देखील दिले, या महिलेने दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांनी कळवा येथे अत्याचार केल्याचा आरोप केला, या महिलेने यासंबधी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याचीही माहिती आहे.त्यानंतर या महिलेने तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात लाखो रुपयांची मागणी केली होती, अशा प्रकारे या महिलेने अनेक अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवल्याचं बोललं जात होतं.
ठाणे जिल्ह्यात या महिलेने 14 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते, यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, सेवाकर सहाय्यक आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस उपनिरीक्षक, आणि राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक, या दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन तपास करण्यात आला.
आणखी वाचा
Comments are closed.