मदत करतो बोलून गाडीवर बसवले; निर्जनस्थळी नेऊन महिलेवर वारंवार संभोग; पुन्हा महाराष्ट्र हादरला

अमरावती क्राईम न्यूज : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका 65 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधाराने पोलिसांनी अटक केली आहे. (Amravati Crime News)

नेमकं काय घडलं? (Amravati Crime News)

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील म.प्र.येथील एका गावातून परतवाडा येथे उपचाराकरीता पायी जात असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात आरोपीने, मी पण परतवाडा येथे जात आहे चला मी तुम्हांला माझ्या गाडीवर सोडतो असे म्हणून पीडित महिलेस स्वतःच्या दुचाकीवर बसवले आणि परतवाडाकडे निघाला. रस्त्यातच खरपी शिवारात रस्त्याच्या डावीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर निर्जन आणि एकांत ठिकाणी आरोपीने वृद्ध महिलेस मला इकडे एक काम आहे, चला आपण तिकडे जाऊ, माझे काम करून पूढे परतवाड्याला जाऊ, असे म्हणून महिलेस गाडीखाली उतरवून तिला पांदन रस्त्याकडे नेले आणि तिथे कोणीही नसल्याचा फायदा घेत वृद्ध महिलेशी बळजबरीने वारंवार संभोग केला आणि महिलेकडील तिच्या उपचाराकरीता असलेले 600 रुपये बळजबरीने काढून घेतले.

पीडित महिलाला मारहाणही केली- (Amravati Crime News)

सदर घटनेदरम्यान गुन्ह्यातील पीडित महिलेला गंभीर दुखापत आरोपीने केली. आरोपीने पीडित महिलेस स्वतःचे दुचाकीवर ज्या मार्गाने नेले, त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी शिरजगाव कसबा पोलीसांनी केली आणि त्याला आज अटक केली असून आरोपीचे नाव आवेज खान युनुस खान, राहणार परतवाडा असे असल्याचे निष्पन्न झाले.

भंडाऱ्याच्या मोहदुरा गावातही हादरवणारी घटना- (Bhandara Crime News)

भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवरचं एका नराधमान अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या मोहदुरा गावात घडला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीची मुलगी आणि पीडिता या दोघीही एकाच वर्गात शिकतात. पीडिता तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच आरोपीच्या घरी थांबली असताना, आरोपीनं तिला दुचाकीवर फिरवून आणण्याच्या बहाण्यानं बाहेर नेत एका निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेच्या धक्क्यातून आणि मानसिक त्रासातून पीडितेनं विषप्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी आरोपी सोमा मेश्राम याला अटक केली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Latur : लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

आणखी वाचा

Comments are closed.