विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, बोरिवली, पंतनगर येथील 2500 म्हाडाच्या घरांची सोडत
म्हाडा लॉटरी 2026 मुंबई : मुंबईत स्वतःचं घर घेऊ पाहणारियासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) लवकरच मुंबईतील 2500 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाणार आहे. लवकरच म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील जवळपास 2500 घरांसाठी हे सोडत निघणार आहे. सोडतीत यंदा 32 लाख ते 8 कोटींपर्यंत घरांच्या किंमती असणार आहे. मात्र, म्हडाच्या घरांची यंदाच्या सोडतीत कोटीच्या कोटी उड्डाणे अधिक असल्याची चर्चा आहे.
Mhada Lottery 2026 : नोंदणी प्रक्रिया कधी, किंमत किती?, A टू Z माहिती
दरम्यानमिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक घरे यंदा मध्यम आणि उच्च गटासाठी असणार आहे. पहाडी गोरेगावमधील पीएमएवायची 10 घरे सोडता इतर घरांच्या किंमती कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणेनाही हि घरं घेणं सहज शक्य नसणार असल्याने काही अंशी नाराजी देखील बघायला मिळत आहे. दुसरीकडे पहाडी गोरेगावमधील घरांच्या किंमती अंदाजे ३२ लाख रुपये असणार आहे. ३१ मार्च रोजी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करत नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार, अशी देखील माहिती आहे.
Mumbai News : विक्रोळी कन्नमवार नगरमधील 1200 घरं सोडतीत असणार, अंदाजे 80 लाख रुपये घरांच्या किंमती
विक्रोळी कन्नमवार नगरमधील 1200 घरं सोडतीत असणार आहे. तर अंदाजे 80 लाख रुपये घरांच्या किंमती ज्यात 800 चौ. फुटाचे क्षेत्रफळ असल्याची माहिती आहे. पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगरसारख्या ठिकाणी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे.
मागील लॉटरीतील पात्रतेच्या अटी
म्हाडानं 2025 मध्ये मुंबईतील घरांची लॉटरी काढली नव्हती. त्यापूर्वी 2024 मध्ये म्हाडाकडून लॉटरी 2000 घरांसाठी काढण्यात आली होती. त्यावेळी घरांची किंमत 29 लाख ते 6.82 कोटी रुपयांदरम्यान होती. म्हाडाकडून संगणीकृत पद्धतीनं विविध उत्पन्न गटातील अर्जदारांच्या यादीनुसार सोडत काढली जाते. म्हाडाची विविध मंडळं कार्यरत असून मुंबईशिवाय पुणेकोण, नाशिकसंभाजीनगर मंडळं देखील लॉटरी जाहीर करतात. म्हाडाची स्थापना 1977 मध्ये झाली होती. तेव्हापासून म्हाडानं 5.27 लाख घरं बांधली आहेत.
अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार विवाहीत असल्यास पती/पत्नी यांचे आधार कार्ड/ पॅन कार्ड,अर्जदार अविवाहीत असल्यास स्वतःचे आधार कार्ड/पॅन कार्ड.अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate) (अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे.)
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.