झिरवाळ म्हणतात लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर ताण!
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे. आता राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे हा ताण आणखी वाढला असून ही योजना म्हणजे ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ अशी अवस्था झाली असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आली होती. आपण ती सोडू शकत नाही. पण राज्यात आर्थिक स्थिती तणावपूर्ण आहे. सध्या किमान 4-6 महिने पुरेल इतके अन्नधान्य उपलब्ध आहे, पण पाणी नाही. दुष्काळग्रस्त भागांमध्ये रेल्वेने पाणी पोहोचवण्याच्या योजनांसाठीसुद्धा पैशांची गरज लागेल. त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे झिरवाळ म्हणाले.
Comments are closed.