IPL 2026 – सॅण्टनरला महिनाभर विश्रांती
न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार मिचेल सॅण्टनर आयपीएलमधील एका झेलामुळे मोठय़ा अडचणीत सापडला आहे. आयपीएल सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मारलेल्या डाइव्हदरम्यान त्याच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीची त्याला गंभीर किंमत मोजावी लागत असून किमान महिनाभर क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे तो आयर्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना आणि इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी खेळू शकणार नसल्याचे न्यूझीलंडने जाहीर केले आहे. येत्या 27 मेपासून बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्ध लढत होणार असून त्यानंतर लॉर्ड्स, द ओव्हल आणि ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध तीन कसोटींची मालिका रंगणार आहे. मात्र सॅण्टनरचे पुनरागमन कधी होणार याचा निर्णय आता त्याच्या फिटनेसवरच अवलंबून राहणार आहे.
Comments are closed.