मोठी बातमी: मुंबईत डिझेल पुरवठ्यात कपात, पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा, मालवाहतूकदार, खासगी वा

मुंबईत डिझेलचा तुटवडा मुंबई शहरात डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांनी कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये सध्या डिझेलच्या (Diesel Price) पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांनी कपात केली असून, त्याचा परिणाम शहरातील काही पेट्रोल पंपांवरील (Petrol Pump) उपलब्धतेवर दिसून येत आहे. विशेषतः मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहन चालकांना (Diesel Vehicles) डिझेलसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, पेट्रोलचा पुरवठा स्थिर असल्याने सामान्य वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai Latest News)

सूत्रांच्या माहितीनुसार, तेल कंपन्यांकडून उद्योग क्षेत्राला डिझेल पुरवठा करण्यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांना डिझेलचा पुरवठा तुलनेने कमी प्रमाणात होत आहे. गेल्यावर्षीच्या कोट्याच्या तुलनेत मुंबईतील डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे काही भागांमध्ये डिझेलचा साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून, ट्रान्सपोर्ट क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

अनेक व्यावसायिकांना आणि कारखान्यांना दैनंदिन कामकाजासाठी डिझेलची गरज असते. त्यासाठी या कारखान्यांना कोटा ठरवून दिलेला असतो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या सर्व कारखान्यांना पेट्रोलियम कंपन्यांकडून ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त डिझेल दिले जात आहे. परिणामी मुंबईत येणाऱ्या डिझेल पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईचा डिझेल पुरवठा कधी सुरळीत होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

Diesel Price in Maharashtra: देशाच्या प्रमुख शहरांमधील डिझेलचा आजचा भाव किती?

मुंबई: ₹90.03/लिटर

पुणे/नागपूर: सुमारे ₹90-92/लिटर

नवी दिल्ली: ₹87.71/लिटर

चेन्नई: ₹92.38/लिटर

कोलकाता: ₹91.81/लिटर

आणखी वाचा

लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा

‘एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..’ राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा

आणखी वाचा

Comments are closed.