’07:07′ पोस्टनंतर हार्दिक पांड्याचं इंस्टाग्राम अकाउंट गायब; नाव सर्च करताच Error आला

हार्दिक पांड्या इंस्टाग्राम अकाउंट बातम्या: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. इंस्टाग्राम अ‍ॅप किंवा वेबसाईटवर हार्दिकचं प्रोफाइल सर्च केल्यावर क्षमस्व, हे पृष्ठ उपलब्ध नाही… असा मेसेज दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम आणि चिंता दोन्ही वाढल्या आहेत. हार्दिकचं अकाउंट नेमकं डिलीट झालंय, हॅक झालंय की इंस्टाग्रामकडून सस्पेंड करण्यात आलंय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हार्दिकचं अकाउंट दिसत नसल्याचे स्क्रीनशॉट शेअर करत चर्चांना उधाण आणलं आहे.

हार्दिक पांड्याच्या इंस्टाग्राम अकाउंटचे काय झाले? (हार्दिक पांड्या इंस्टाग्राम अकाउंट न्यूज)

काही तज्ज्ञांच्या मते, हा इंस्टाग्राममधील तात्पुरता तांत्रिक बिघाड किंवा ग्लिच असू शकतो. अनेकदा मोठ्या सेलिब्रिटींची अकाउंट्स काही वेळासाठी गायब होतात आणि नंतर पुन्हा पूर्ववत दिसू लागतात. त्यामुळे हार्दिकचं अकाउंटही काही वेळात परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तोपर्यंत चाहत्यांची उत्सुकता आणि चिंता कायम राहणार आहे. विशेष म्हणजे हार्दिकच्या इंस्टाग्रामवर तब्बल 40 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

याआधी कोहलीचं अकाउंट झालं होतं अचानक

याआधीही विराट कोहली याचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्याची घटना घडली होती. वर्षाच्या सुरुवातीला विराटचं अकाउंट दिसेनासं झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. त्यावेळीही अकाउंट डिलीट झालं की हॅक झालं, असे अनेक तर्क लावले गेले होते. मात्र काही वेळानंतर विराटचं अकाउंट पुन्हा सुरू झालं होतं. त्यामुळे हार्दिकच्या बाबतीतही असंच काहीसं घडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची बिकट अवस्था

दरम्यान, मुंबई इंडियन्ससंघासाठी आयपीएल 2026 हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी पूर्णपणे ढासळलेली दिसली. मुंबई इंडियन्स हा स्पर्धेतून सर्वात आधी बाहेर पडणाऱ्या संघांपैकी एक ठरला. संघाने 14 लीग सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकले, तर तब्बल 10 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. संघाच्या खराब कामगिरीनंतर चाहत्यांनी हार्दिकच्या कर्णधारपदावर जोरदार टीका केली होती. सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक मीम्स आणि ट्रोलिंगही पाहायला मिळालं.

हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाणार का?

गेल्या काही दिवसांपासून, हार्दिक दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत. विशेषतः हार्दिकच्या फोन स्क्रीनवर ’07:07′ ही वेळ दाखवणाऱ्या एका पोस्टने ऑनलाइन खळबळ उडवून दिली. चाहत्यांनी याचा अर्थ चेन्नई सुपर किंग्स असा लावला. जेव्हा रविचंद्रन अश्विनने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘पाथिराना, 07:07 आणि स्टोक्स!’ असा एक गूढ संदेश पोस्ट केला, तेव्हा या चर्चांना आणखी जोर मिळाला. यामुळे हार्दिकच्या सीएसकेमधील प्रवेशाबद्दल चाहत्यांमधील अटकळांना अधिकच बळ मिळाले.

हे ही वाचा –

Team India T20 Captain Update : श्रेयस अय्यर रेसमधून OUT? टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी अचानक पुढे आला RCBचा सायलेंट किलर; कॅप्टन बनवण्याची जोरदार मागणी

आणखी वाचा

Comments are closed.