आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, पुत्र श्रीकांत शिंदे म्हणाले अजून रसातळाला जाल
आदित्य ठाकरेंवर श्रीकांत शिंदे : शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा तुम्ही खूप टीका केल्या, त्याला सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (श्रीकांत शिंदे) यांनी केलं. आदित्य ठाकरे (आदित्य ठाकरे) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिलं.टीका करत बसले म्हणून अडीच वर्षात ही परिस्थिती झाली अजून रसातळाला जाल, असा टोला देखील श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
काय परिस्थिती झाली पार्टीची त्याला वाढवायला फिरायला पाहिजे असेही ते म्हणाले.
तुम्ही टीका केल्या पण सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिलं
शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा तुम्ही खूप टीका केल्या त्याला सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यांना टीका करत राहू द्या, आता तेवढाच टाईमपास उरला आहे, असा टोला देखील श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
एकनाथ शिंदे हे सूर्यास्तापूर्वी हेलिकॉप्टरने दरेगावला जातील, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. टीका करत बसल्यामुळेच अडीच वर्षांत ही परिस्थिती ओढवली असून, असेच सुरू राहिले तर आणखी रसातळाला जाल, असा इशारा त्यांनी दिला. लोकांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला मतपेटीतूनच उत्तर दिल आहे, त्यामुळे त्यांना टीका करत राहू द्या, आता त्यांच्याकडे तेवढाच टाईमपास शिल्लक आहे, असा टोला देखील श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.
अभिमन्यू खोतकर यांच चांगलं काम, अर्जुन खोतकरांच्या मुलाला उमेदवारी देण्याबाबत श्रीकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य
शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना परभणी – हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अभिमन्यू खोतकर यांचे युवा सेनेचे चांगलं काम असल्याचे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. या सगळ्या गोष्टी पक्ष बारकाईने बघत असतो. त्यामुळं या बाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील असेही खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Aaditya Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंवर पहिली केस, भावाच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे मैदानात; म्हणाले, मोडून काढू ही दादागिरी!
आणखी वाचा
Comments are closed.