Mumbai News – शाळेच्या शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्याचा विनयभंग; गोवंडीतील संतापजनक घटना, आरोपीला अटक
गोवंडी परिसरात एका नामांकित शाळेत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सहा वर्षाच्या विद्यार्थ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळेच्या शिपायाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. राजेश महाकाल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी राजेश हा गेल्या वर्षभरापासून पीडित विद्यार्थ्याशी गैरवर्तन करत होता. आरोपीने शाळेतील एका रिकाम्या खोलीत नेऊन विद्यार्थ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गोवंडी पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी शिपायाला अटक केली आहे.
Comments are closed.