जुहूतील नानावटींच्या हेरिटेज ‘लीला’ बंगल्याची 221 कोटीना विक्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विस्तीर्ण समुद्राचे विहंगम दृश्य दाखवणारा आणि अप्रतिम सी-फेस गार्डन असलेला जुहूतील नानावटींच्या मालकीचा आलिशान हेरिटेज ‘लीला’ बंगला तब्बल 221 कोटींना विकला गेला आहे. मुंबईतील मौल्यवान वास्तू म्हणून ओळखला जाणारा सहा-बीएचके प्रशस्थ बंगला नूतननदास रिअल्टीने खरेदी केला आहे. 75 वर्षांपूर्वी बांधलेला हा बंगला हेरिटेज वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे.

हेरिटेज ग्रेड – 2 बी श्रेणीमध्ये या बंगल्याची नोंद आहे. जुहू तारा रोडनजीक जुहू बीचच्या अगदी जवळच हा बंगला आहे. 1950 दशकात हा बंगला बांधला गेला. विले पार्ले येथील नानावटी रुग्णालय चालवणाऱ्या नानावटी कुटुंबाच्या मालकीचा हा बंगला आहे.

बंगला तोडता येणार नाही

‘लीला’ बंगल्याची रीतसर निविदा प्रक्रिया राबवून विक्री करण्यात आली असली तरी ग्रेड – 2 बी श्रेणीत असल्यामुळे बंगला तोडून इमारत उभारता येणार नाही. फक्त गरज असल्यास दुरुस्ती, रंगकाम करून हा बंगला वापरता येईल. या हेरिटेज बंगल्याच्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावता येणार नाही.

अशी आहेत बंगल्याची वैशिष्टय़े

  • 1950च्या दशकात बांधलेला हा बंगला ‘आर्ट डिको’ शैलीत बांधण्यात आला आहे. ‘ग्राऊंड प्लस टू’ असलेला हा बंगला 14858 चौरस फूट जागेत विस्तारित आहे.
  • या मालमत्तेचे एकूण बिल्ट अप क्षेत्र 8 हजार 400 चौरस फूट आहे. यामध्ये दोन लिव्हिंग रूम, एक डायनिंग रूम, सहा बेडरूम आणि सहा व्हरांडे आहेत.
  • चार कार पार्किंगसाठी जागा, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी खोलीचीही इथे व्यवस्था आहे. बाल्कनी 2653 चौरस फुटांची असून इथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

Comments are closed.