नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पंतप्रधानांचं विमान उतरणार; नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा कस
नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर (Narendra Modi In Mumbai) आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Navi Mumbai International Airport) आणि मेट्रो 3 च्या (Metro 3) अखेरच्या टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.
विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi Navi Mumbai Airport) विमान उतरणार आहे. या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात येईल. नरेंद्र मोदी विमानतळावर आल्यानंतर टर्मिनल इमारत आणि एकूण प्रकल्पाची माहिती जाणून घेतील. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होईल. मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह पुण्यातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे.
लोकार्पण होण्याआधी लोककलेचे विविध कार्यक्रम सादर करणार-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर अनुभवता येणार आहे. त्यासाठी सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समूहाकडून महाराष्ट्राच्या लोककला सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील लावणी, नाशिकचा दहीहंडी नृत्याविष्कार, विदर्भातील गोंधळी, कोकणातील झेलक्यांचा ठेका तसंच आदिवासी आणि आगरी-कोळी नृत्यांच्या तालावर संपूर्ण परिसर रंगून जाणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होण्याआधी लोककलेचे विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्यं काय?
- विमानतळ उभारणीस एकूण खर्च 1 लाख कोटींहून जास्त झाला आहे.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे.
- जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत.
- पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक (Eco-friendly) असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे.
- टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे.
- नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे.
आज कशाकशाचं उद्घाटन?
1. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन
2. मुंबई मेट्रो-3 च्या अत्रे चौक-कफ परेड दरम्यानच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
3. मेट्रो,लोकल आणि बसची तिकिटे ‘मुंबई वन’ या एकाच ऍपवर
4. ‘अल्प कालावधीच्या रोजगारक्षम कार्यक्रमाचा’ मोदींच्या हस्ते प्रारंभ
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.