न्यायाधीशांनी दोषी ठरवलं पण भीमराव कांबळेच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही, सरकारी वकील म्हणाले,
नसरापूर खटल्याचा निकाल : राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि अवघ्या महाराष्ट्रचंच लक्ष लागून राहिलेल्या नसरापूर प्रकरणातील आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. नसरापूर प्रकरणात (Nasrapur Rape Case) विक्रमी वेळेत आरोपपत्र सादर करुन या खटल्याची विक्रमी वेळेत सुनावणी झाली होती. आज न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) दोषी असल्याचा निकाल दिला. तर यातील आरोपीला फाशीची शिक्षण सुनावण्यात यावी असं हलविलेri वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. तर ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी दोन गुन्ह्यांमधे फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षा़ंच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. (Pune Crime Nasrapur Case) तर कोर्टात सुनावणीवेळी न्यायाधीशांनी दोषी ठरवलं तेव्हा भीमराव कांबळेच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. परिणामी ‘हा सुधारण्याच्या पलीकडे गेलाय, समाजासाठी घातक’ असल्याचा दावा करत कठोरात कठोर कारवाईची मागणी सरकारी वकीलांकडून करण्यात आली आहे. (Bhimrao Kamble Nasrapur Case Verdict)
नसरापूर प्रकरणाचा निकाल : आरोपी समाजासाठी घातक, सुधारण्याच्या पलिकडे गेलाय;. त्यामुळे फाशी हीच योग्य शिक्षण
ही घटना समाजासाठी घातक असून त्या दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झालेत. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध झालाय. या आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता तो कोणत्याही परिस्थितीत सुधरू शकत नाही. या आधीच्या दोन गुन्ह्यांमधे हा आरोपी दुर्दैवीरित्या सुटला होता. मात्र तो समाजासाठी घातक आहे. तो सुधारण्याच्या पलिकडे गेलाय. त्यामुळे फक्त फाशी हीच या आरोपीला योग्य राहील, अस सरकारी वकिलांच म्हणणय.
नसरापूर खटल्याचा निकाल : …तर तो वृद्ध असल्याने इतका क्रुर गुन्हा करु शकतो का? आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद
तर आरोपींच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लागत नसल्याचा युक्तीवाद केलाय. त्याचबरोबर आऱोपीच्या वकिलांनी तो स्व:त या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा आणि तो 65 वर्षांचा वृद्ध असल्याचा युक्तीवाद केला. तो वृद्ध असल्याने इतका क्रुर गुन्हा करु शकतो का? असाही आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जन्मठेप ही या आरोपीला योग्य शिक्षा राहिल असा दावा केलाहे. तर आरोपीला वाचवण्यासाठी त्याच कुटुंब देखील पुढं आलं नाही. कारण त्याच्या कुटुंबाने दोनवेळा सुधारण्याची संधी देऊनही तो सुधारला नाही. या गुन्हेगाराचे वय पाहता तो सुधरु शकत नाही. त्याच्या शरिर बोलीवरुन आजतागायत कोणताही पश्चाताप झाल्याच आढळून आलेल नाही, शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या चेहर्यावरील रेष देखील हललेली नाही. अशी भूमिका सरकार वकिलांनी मांडली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.