निदा खानच्या वकिलांनी कोर्टात सतत तेच ‘फोकस’ ठेवलं; नाशिक कोर्टात काय काय घडलं?
निदा खान नाशिक TCS प्रकरण: नाशिक टीसीएस प्रकरणातील (Nashik TCS Case) आरोपी निदा खानला (Nida Khan) नाशिक रोड न्यायालयाने 11 मेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून निदा खानची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान नाशिक पोलीस काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. धर्मातर प्रकरणात निदाचा प्रत्यक्ष काय रोल होता. 25 मार्चला निदा खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हापासून निदा कुठे होती? कोणाकोणाच्या संपर्कात होती? मुंब्रा, मुंबईभिवंडी याभागात तिला कोणी आश्रय दिला? मतीन पटेलचा संबंध कधीपासून होता, मतीन पटेल आणि निदा खानची ओळख कशी आणि कोणाच्या माध्यमातून झाली? निदा खानचे मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन काही आहे का?, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं एसआयटी शोधणार आहेत. (Nida Khan Nashik TCS Case)
नाशिक टीसीएस प्रकरणी काल सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपी निदा खान हिचे वकील ॲड राहुल कासलीवाल सतत एकच गोष्टीवर लक्षकेंद्रीत करत असल्याचे दिसून आले. निदा खान गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे निदा खान हिचे वकील ॲड राहुल कासलीवाल यांनी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. तसेच निदा खान गर्भवती असल्याने तिला किती दिवस पोलीस कोठडी द्यावी, याचा मानवी दृष्टीकोनातून विचार करावा, असं अॅड राहुल कासलीवाल म्हणाले. तसेच निदा खान ही गर्भवती असल्याने पोलिस कोठडीत तिच्या आईला सकाळ-संध्याकाळ भेटण्यास कोर्टान परवानगी दिलेली आहे. बचाव पक्षातर्फे तशी मागणी करण्यात आली होती. (Nida Khan Nashik TCS Case)
काय म्हणाले बचाव पक्षाचे वकील? (Nida Khan TCS Case)
निदाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्याने पोलीस कोठडीची शक्यता आधीपासून होती. बुरखा कुठून आणला हा मुद्दा अनावश्यक असून, बुरखा ही प्रतिबंधित वस्तू नाही, तो कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतो. अॅप डाउनलोड करून लिंक पाठविल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असं निदा खानचे वकील म्हणाले. निदा हिचा मोबाइल आधीच पोलिसांनी जप्त केला असून, त्यातून अजून काय शोधायचे आहे?, असा सवाल निदा खानच्या वकिलांनी उपस्थित केला. तसेच निदा खान गर्भवती असल्याने तिला किती दिवस पोलिस कोठडी द्यावी याचा मानवी दृष्टिकोनातून विचार करावा, असंही निदा खानचे वकील म्हणाले.
निदा खानवर आरोप काय? (Nida Khan Nashik TCS Case)
- निदा खानवर धार्मिक भावना दुखावणे हेतूने गुन्हा दाखल
- पीडित तरुणी आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि धार्मिक भावना दुखावणे यात तिचा थेट संबंध
- निदा खान आणि दानिश शेख हे दोघे हिंदू देव-देवतांवर अश्लील टिप्पणी करत होते.
- पीडित महिलांना पुरुष आरोपी अश्लील प्रकार करत होते तेव्हा निदा खान ही त्यांना प्रतिसाद देत असत…
- पीडित महिला ह्या आरोपींच्या संपर्कात असताना त्यांना अश्लील कृत्य करताना निदा बघ्याची भूमिका घेत…
- महिला असताना महिलेवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छळवणूक ह्यावर निदा खान कटकारस्थान मध्ये सहभागी होती.
- धार्मिक भावना दुखावणे, ॲट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे.
- पीडित महिलांनावर अत्याचार होत असताना कटात सहभागी असल्याचा आरोप देखील निदा खानवर आहे.
- एकूणच ह्या गुन्ह्यात निदा खानची भूमिका मुख्य सूत्रधारची असल्याने ती इतर आरोपींना गुन्ह्यात मदत करत असल्याचा तपासता उघडकीस आले आहे.
जामीन फेटाळला अन् ‘गेम’ उलटला- (Nida Khan Nashik TCS Case)
दरम्यान, निदा खानने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच प्रकरणात अटकेत असलेले इतर आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांचीही चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत संग्राम जगताप? (निदा वर संग्राम जगताप)
टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने मदत केल्याचे समोर आले आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी टीकास्त्र सोडले. या लोकांना देशातूनच नाही तर देशाच्या बाहेरून देखील काही लोक मदत करतात. यातूनच या लोकांची हिंमत वाढते, यापूर्वी आम्ही केवळ “लव्ह जिहाद” ऐकत होतो आता “कॉर्पोरेट जिहाद” हा नवीन प्रकार समोर आला आहे. या जिहादला एमआयएमचा एक नगरसेवक नाही तर अनेक लोक मदत करतात. इम्तियाज जलील हा यांचा प्रमुख आहे. जलील नेहमीच या लोकांचं समर्थन करतो. हे राज्याला आणि देशाला अतिशय धोकादायक आहे, असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.