ठाण्यात अधिकाऱ्यांची झाडाझडती; अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीला नगरसेवकांनी घेरले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

करतो, बघतो, पुढील महासभेत उत्तर देतो, बघून सांगतो, सांगून बघतो, माहिती घेतो अशी गोलमगोल उत्तरे देणाऱ्या ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांना नगरसेवक अक्षरशः वैतागले आहेत. प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला असून अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीला नगरसेवकांनी आज महासभेत घेरले. त्यामुळे आमच्याआधी त्यांना प्रशिक्षण द्या, असे ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आयुक्त सौरभ राव यांना सुनावले.

महासभेत विषयपत्रिका सुरू होण्यापूर्वी प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र प्रशासनाकडून देण्यात आलेले उत्तर अपुरे आणि गोलमगोल असल्याचा आरोप करीत भगत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी हस्तक्षेप करीत संबंधित विषयावर मंगळवारी महापौर दालनात बैठक घेण्याचे निर्देश दिले. मात्र नगरसेवकांनी हा तोडगा फेटाळत जनतेचे प्रश्न महासभेत विचारले जातात, त्यांची उत्तरेही महासभेतच मिळाली पाहिजेत अशी ठाम भूमिका घेतली.

Comments are closed.