राजकीय कारणांमुळे पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निकाल पुढे ढकलला का? ओमराजे निंबाळकर म्हणाले..
Pawanraje Nimbalkar Case धाराशिव : राजकीय वर्तुळातील बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज, 20 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) लागणार आहे. दरम्यान, या ऐतिहासिक आणि संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल 16 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) लागणे अपेक्षित होते. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला होता. परिणामी आज तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Dharashiv News)याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, निश्चितपणे मागच्या वीस वर्षापासून माझं कुटुंब आणि माझ्या वडिलांचे चालक समद काझी यांचं कुटुंब ज्या गोष्टीसाठी न्यायालयीन लढा देत आहे, संघर्ष करत आहे आणि अनेक यातना या वीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही सोसलेल्या आहेत, ज्यांच्यामुळे ही वेळ आमच्यावर आली, त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे. आणि आजच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे, आजची तारीख माननीय न्यायालयाने राखीव करून ठेवली होती, निश्चितपणे न्याय देवता न्याय करेल ही अपेक्षा आहे, असंही ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं आहे.(Omraje Nimbalkar on Pawanraje Nimbalkar Case)
तर राजकीय प्रभावामुळे या केसचा निकाल पुढे ढकलला होता, न्याय मिळण्यास वेळ झाला अशी चर्चा होती, यामध्ये तथ्य आहे का? या प्रश्नावरती ओमराजे निंबाळकर म्हणाले, हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. यामध्ये काही ही तथ्य नाही, आज निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल असे ओमराज निंबाळकर यांनी म्हटलं आहे. तर आजच्या निकालासाठी ओमराजे निंबाळकर यांच्यासह त्यांचे बंधू जयराजे निंबाळकर त्यांचे कुटुंबीय तसेच समद काझी यांचे कुटुंबीय सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv) राजकीय वादाचे रुपांतर हत्याप्रकरणात होऊन घडलेल्या घटनेला 20 वर्षे उलटून गेली असून फिर्यादी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला (धाराशिव) जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुरू असलेला न्यायालयीन (Court) खटला अंतिम टप्प्यात असून आज 16 जून रोजी निकालाची तारीख देण्यात आली होती. मात्र, आणखी काही कमतरता दूर करण्यासाठी आता 20 जून ही नवी तारीख देण्यात आली आहे. आज या न्यायालयीन निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं प्रकरण काय? (What is Pawanraje Nimbalkar Case)
दरम्यान, 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.