हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची खोचक टीका
सोलापूर : जमिनीच्या सातबाऱ्यावर ‘मुंबई सरकार’ तसेच ‘महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग’ व ईतर तत्सम अधिकृत उल्लेख असतानाही पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनी च्या नावावर केली. उद्या हे पवार महाराष्ट्राचे विधानभवन पण आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत, अशा शब्दात obc नेते लक्ष्मण हाके यांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीने पुण्यात खरेदी केलेल्या जमिनीवरुन हल्लाबोल केला आहे. दरम्यान, संबंधित जमीन व्यवहारावरुन राज्यभरात गदारोळ उठल्यानंतर, विरोधकांकडून टीकेची झोड उठल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर बऱ्यापैकी पडदा पडला असता, आज obc नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केलीय. उद्या महाराष्ट्राची विधानसभा देखील हे सुपुत्र आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. या सुपुत्राने असे पराक्रम केले आहेत की जमिनीच्या सात-बाऱ्यावर 'मुंबई सरकार’ तसेच ‘महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग’ व ईतर तत्सम अधिकृत उल्लेख असतानाही पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली. उद्या हे पवार महाराष्ट्राचे विधानभवन पण आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत, असा टोला हाके यांनी लगावला. आपला बाप राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, आजोबा देशाचा नेता आहे आणि आत्या काही झाले तरी आपल्याला पाठिंबा देणार आहे. हे सर्व पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली पण आता इथे पवार ईस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रात काम करत असल्याची घणाघाती टीका हाके यांनी केली.
अजित पवारांनी राजीनामा द्यावा – हाके
आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या अजितदादांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. सातत्याने राज्याच्या अर्थ खात्याला जसा गुळाला मुंगळा चिटकतो तसे हे अजित दादा चिटकून आहेत. पदाचा गैरवापर करून अधिकृत जमिनी हडपणे हा धंदा अजितदादांसाठी नवा नसून आता पार्थ पवार त्यांचा वारसा चालवत आहे, अशी टीका हाकेंनी केली. एका बाजूला फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात बोलतो म्हणायचे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा हा दिवटा बघा काय करतो आहे, असेही हाके यांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.