ठाणे महानगरपालिकेतील आठ उपअभियंत्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील आठ उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विभागीय पदोन्नती निवड समितीने आठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची शिफारस केली असून प्रशासनाने त्यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र या आठपैकी पाच अधिकाऱ्यांच्याच पदोन्नतीचे आदेश तातडीने काढणे शक्य होणार असून उर्वरित तिघांना निर्धारित कालावधी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महापालिकेच्या उपअभियंता या वर्ग दोनच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना वर्ग एकमधील कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याबाबत ५ नोव्हेंबरला विभागीय पदोन्नती निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव तसेच गोपनीय अहवाल तपासण्यात आले. या निकषांच्या आधारे शैलेंद्र चारी, अतुल भोळे, माधव जागडे, अनिल पाटील, किशोर गोळे, उमेश भोसले, ऋषिकेश जवळकर आणि राजेंद्र कुसूरकर यांच्या पदोन्नतीची शिफारस करण्यात आली आहे.

Comments are closed.