नोकरी न मिळाल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उच्च शिक्षण पूर्ण करूनही अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तन येथे घडली आहे. फ्लेविन आशिष नागोरामा (३० वर्षे, रा. मोठागाव, उत्तन) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फ्लेविन याने उच्च शिक्षण पूर्ण केले होते. मात्र शिक्षणानुसार अपेक्षित नोकरी मिळत नसल्याने तो मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून मंगळवारी त्याने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृताचे वडील आशिष नागोरामा (६०) यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.