पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : स्थापनेपासून आजवरचा प्रवास, राजकीय वर्चस्व आणि बदलती समीकरणे
पिंपरी-चिंचवड : पुणे शहराच्या शेजारी वेगाने विकसित झालेले औद्योगिक आणि नागरी केंद्र म्हणून ओळख असलेले पिंपरी-चिंचवड हे शहर केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या शहराचा कारभार पाहणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ही राज्यातील मोठ्या आणि प्रभावी महानगरपालिकांपैकी एक आहे. तिची स्थापना, वाढता विस्तार, बदलते राजकीय सत्तासमीकरण आणि सध्याचे राजकारण यामुळे PCMC कायम चर्चेत राहिली आहे.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: महापालिकेची स्थापना आणि प्रारंभिक टप्पा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत स्थापना 11 ऑक्टोबर 1982 रोजी झाली. त्यापूर्वी 1970 मध्ये पिंपरी-चिंचवड नगरपरिषद अस्तित्वात आली होती. MIDC परिसर, औद्योगिक वसाहती आणि रोजगाराच्या संधींमुळे या भागात झपाट्याने लोकसंख्या वाढू लागली. त्यातूनच स्वतंत्र महानगरपालिकेची गरज निर्माण झाली. स्थापनेनंतर हळूहळू शहराचा भौगोलिक विस्तार वाढत गेला आणि अनेक गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: औद्योगिक शहरातून महानगराकडे वाटचाल
पिंपरी-चिंचवडची ओळख सुरुवातीला ‘औद्योगिक शहर’ अशीच होती. ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमुळे शहराची आर्थिक घडी मजबूत झाली. मात्र, याच औद्योगिकीकरणामुळे पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, गृहनिर्माण आणि पर्यावरण यांसारखी आव्हानेही वाढली. या सगळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडली.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: एकूण जागा – 128
साइड फोर्स –
भाजप- 77
राष्ट्रवादी काँग्रेस- 36
शिवसेना-09
काँग्रेस – 00
मनसे- 01
अपक्ष – 05
सत्ता कुणाची – भाजप
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: सध्या कोणत्या पक्षात मुख्य लढत
– भाजप विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादी
– भाजपची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी युतीसाठी चर्चा सुरू आहे
– अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडीची चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ही सोबत घेण्याचा विचार.
– ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ही एकत्र येणाच्या तयारीत
– अशा प्रसंगी काँग्रेस कोणत्या आघाडीत असेल किंवा युतीत असेल याकडे लक्ष
– भाजप विरुद्ध सर्व पक्षीयांची आघाडी असं समीकरण जुळवण्याचे ही काही नेत्यांकडून प्रयत्न सुरुयेत
– प्रत्यक्षात यातील कोणकोणती समीकरणं सत्यात उतरणार, हे पाहणं महत्वाचं
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: गेल्यावेळचा व्होट शेअर
भाजप – 37.06 %
राष्ट्रवादी काँग्रेस – 28.57%
शिवसेना – 16.60 %
काँग्रेस – 3.11 %
मनसे – 1.38 %
अपक्ष – 8.57 %
नोटा – 2.82 %
पिंपरी चिंचवड महानगरपालिका: महानगर रचना रचना
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य सभेत एकूण 128 नगरसेवक असतात. हे नगरसेवक थेट जनतेतून निवडून दिले जातात. महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा महापालिका आयुक्त (IAS अधिकारी) असतो. स्थायी समिती, विषय समित्या आणि विविध विभागांद्वारे शहराचा कारभार चालवला जातो. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक मानले जात असले, तरी प्रत्यक्ष प्रशासकीय अधिकार आयुक्तांकडे असतात.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: 2017 ची महापालिका निवडणूक : राजकीय वळण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात 2017 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा राजकीय धक्का देत स्पष्ट बहुमत मिळवले.
2017 निवडणुकीचा निकाल
पक्ष जिंकलेल्या जागा
भारतीय जनता पक्ष (भाजप) 77
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 36
शिवसेना 9
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)
अपक्ष 5
काँग्रेस 0
एकूण 128
निकालाचे सखोल विश्लेषण
2017 पूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. मात्र, या निवडणुकीत भाजपने आक्रमक प्रचार, स्थानिक नेतृत्व आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सत्ता काबीज केली. 128 पैकी 77 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली.
राष्ट्रवादी काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला 9 जागा मिळाल्या, मात्र शहरस्तरावर अपेक्षित प्रभाव टाकण्यात ती अपयशी ठरली. मनसे आणि अपक्ष काही भागांत मर्यादित प्रभाव दाखवू शकले. काँग्रेसला मात्र एकही जागा मिळाली नाही, हा त्या पक्षासाठी मोठा धक्का मानला गेला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपचा मतवाटा आणि त्या मतवाट्याचे जागांमध्ये रूपांतर (seat conversion rate) हे या निवडणुकीचे निर्णायक वैशिष्ट्य ठरले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका : भाजप सत्ताकलतील कार्बोर
भाजपच्या सत्ताकाळात शहरातील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला. रस्ते विकास, जलवाहिन्या, स्मार्ट सिटी उपक्रम, नदी सुधार प्रकल्प आणि प्रशासकीय पारदर्शकता हे मुद्दे अधोरेखित करण्यात आले. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून विकासकामांच्या खर्चावर, नियोजनावर आणि प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: प्रशासक राजवट आणि लोकप्रतिनिधींचा अभाव
निवडणूक कालावधी संपल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासक राजवटीखाली गेली. यामुळे महापौर, नगरसेवक आणि स्थायी समित्या अस्तित्वात राहिल्या नाहीत. प्रशासकीय निर्णय जलद होत असल्याचा दावा केला जात असला, तरी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जनतेच्या थेट प्रश्नांना व्यासपीठ मिळत नसल्याची टीकाही होत आहे.
Pimpri chinchwad MahanagarPalika: Sadyache Rajkiya Parvara
सध्या पिंपरी-चिंचवडचे राजकारण अत्यंत गतिमान झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे शिंदे व उद्धव ठाकरे गट, तसेच इतर पक्ष आगामी निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. पक्षांतर, संभाव्य युती, उमेदवार निवड आणि स्थानिक नेत्यांची भूमिका यावर चर्चा रंगली आहे.
पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणीय प्रश्न हे मुद्दे आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. औद्योगिक शहर असतानाच आता निवासी आणि आयटी हब म्हणून उभ्या राहत असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: पिंपरी-चिंचवड विभागाची रचना 'जैसे थे'
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 2017च्या निवडणुकीप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये 32 प्रभाग आणि 128 नगरसेवक असणार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक लोकसंख्येचा मोठा प्रभाग आहे, तर प्रभाग क्रमांक पाच हा सर्वांत कमी लोकसंख्येचा आहे. प्रभागरचनेवर हरकती आणि सूचनांसाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहेत.
महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट लागू असून, आयुक्त प्रशासकाची जबाबदारी सांभाळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. यानुसार महापालिकेची निवडणूकही 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडणार आहे. यासाठी सन 2011च्या जनगणनेनुसार असलेल्या 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्येच्या आधारावर प्रभागांची रचना करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: विभागीय आरक्षण
महिला आणि पुरुष प्रत्येकी 64, अनुसूचित जातीसाठी (एससी) 20, अनुसूचित जमाती (एसटी) तीन, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) 35 आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी 70 जागा राखीव असणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : 32 वा प्रभाग कोणता?
प्रभाग क्रमांक 1 – चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती
प्रभाग क्रमांक 2- चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग
प्रभाग क्रमांक 3 – मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा,, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी, चहोली. डुडूळगाव
प्रभाग क्रमांक 4 – दिघी गजानन महाराजनगर, भारतमातानगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाइन, समर्थनगर, कृष्णानगर आदी, भाग २
प्रभाग क्रमांक 5 – रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्रीपार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहत
प्रभाग क्रमांक 6 – धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन, सद्गुरूनगर
प्रभाग क्रमांक 7 – शीतलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी,
खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर
प्रभाग क्रमांक 8 – जय गणेश साम्राज्य, जलवायू विहार, केंद्रीय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर
प्रभाग क्रमांक 9 – टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्मनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासूळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर
प्रभाग क्रमांक 10 – मोरवाडी, लालटोपीनगर, इंदिरानगर, सरस्वती विश्व विद्यालय, आंबेडकर कॉलनी, दत्तनगर, शाहूनगर, विद्यानगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर
प्रभाग क्रमांक 11 – नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर
प्रभाग क्रमांक 12 – तळवडे गावठाण, एमआयडीसी आयटी पार्क, ज्योतिबा – मंदिर परिसर, सहयोगनगर, रूपीनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती
प्रभाग क्रमांक 13 – निगडी गावठाण, सेक्टर 22, ओटास्कीम, म्हेत्रेवस्ती, र यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण दिर, साईनाथनगर
प्रभाग क्रमांक 14 – चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, शुभश्री सोसायटी, जयगणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो, दत्तवाडी, तुळजाईवस्ती
प्रभाग क्रमांक 15 – आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर न 24, 25, 26, 27, 28, सिंधूनगर, परमार न. पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय र वसाहत
प्रभाग क्रमांक 16 – वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, शिंदे वस्ती, रॉयल T कासा सोसायटी, सेक्टर 29, नंदगिरी श्री सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, मामुर्डी, किवळे
प्रभाग क्रमांक 17 – दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भओईरनगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, बिजलीनगर
प्रभाग क्रमांक 18 – एस के एफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क
प्रभाग क्रमांक 19 विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईल कॉलनी, गावडे पार्क, भीमनगर, सम्राट अशोकनगर, भाटनगर, भाजी मंडई पिंपरी कॅम्प
प्रभाग क्रमांक 20 – विशाल थिएटर परिसर, एच ए कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी, कासारवाडी, कुंदननगर
प्रभाग क्रमांक 21 – मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता रुग्णालय, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, मासूळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदिर
प्रभाग क्रमांक 22 – काळेवाडी विजयनगर, निर्मलनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतिबा नगर, नढेनगर
प्रभाग क्रमांक 23 – प्रसूनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी आदी
प्रभाग क्रमांक 24 – आदित्य बिर्ला रुग्णालय, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर, गणेशनगर, म्हतोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर
प्रभाग क्रमांक 25 – माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकाकनगर, निंबाळकरगनर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती
प्रभाग क्रमांक 26 – पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती,अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणूनगर भाग, रक्षक सोसायटी
प्रभाग क्रमांक 27- तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, आकाशगंगा सोसायटी
प्रभाग क्रमांक 28 – फाइव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनियम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन
प्रभाग क्रमांक 29 – कल्पतरू इस्टेट, क्रांतीनगर, काशीद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुख, सुदर्शननगर
प्रभाग क्रमांक 30 – शंकरवाडी भाग, सरिता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एस टी वर्क शॉप
प्रभाग क्रमांक 31 – राजीव गांधीनगर, गजानन महाराजनगर, कीर्तीनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डनगर भाग, विद्यानगर, उरो रुग्णालय
प्रभाग क्रमांक 32 -सांगवी गावठाण
Comments are closed.