आई सोडून गेली; फिरायला सांगून बापाने दोन्ही लेकरांना जंगलात नेलं, साडेतीन वर्षाच्या मुलीला संपव

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका पित्याने (Pune Crime News) स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून (Pune Crime News) केला, तर पाच वर्षांच्या मुलालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आळेफाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. सागर सदाशिव शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मोशी येथील रहिवासी आहे. आरोपीची पत्नी सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेल्यानंतर तो दोन लहान मुलांसह राहत होता. कौटुंबिक तणाव आणि मानसिक चिडचिडीतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: मुलगा मृत झाल्याचं समजून त्याला जंगलात टाकून…

आरोपीने मुलगा आर्यन आणि मुलगी हर्षदा यांना फिरायला नेतो असं सांगून घराबाहेर नेलं. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरातील निर्जन जंगलात नेऊन प्रथम मुलाचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलगा मृत झाल्याचं समजून त्याला जंगलात टाकून दिल्यानंतर आरोपीने मुलगी हर्षदाचा गळा आवळून निर्घृण खून केला. आर्यन हा जंगल परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खून आणि खुनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.(Pune Crime News)

याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी माहिती देताना सांगितलं की, आर्यन हा जंगल परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खून आणि खुनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

Pune Crime News: फिरायला नेतो म्हणून जंगलात नेलं अन्…

आरोपीने मुलगा आर्यन आणि मुलगी हर्षदा यांना फिरायला नेतो असं सांगून घराबाहेर नेलं. त्यानंतर पुणेनाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरातील निर्जन जंगलात नेऊन प्रथम मुलाचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime News:  आई सहा महिन्यांपूर्वी सोडून गेली अन् बापाने संपवलं

पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला, तर पाच वर्षांच्या मुलालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आळेफाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. सागर सदाशिव शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मोशी येथील रहिवासी आहे. आरोपीची पत्नी सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेल्यानंतर तो दोन लहान मुलांसह राहत होता. कौटुंबिक तणाव आणि मानसिक चिडचिडीतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.