पुण्यात कोणत्या ठिकाणी नव्या तीन महापालिका होण्याची शक्यता; अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय? या
पुणे: पुणे शहरामध्ये आत्ता दोन महानगरपालिका अस्तित्वात आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या दोन महानगर पालिकांचा पुणे शहरात समावेश होतो. मात्र, पुणे महानगरपालिकेचा भाग असलेला हडपसर भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी कायम होत असते. पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश झाला. आजही या गावांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही. येथील पाणी कचरा व बेकायदा इमारतींचा प्रश्न तसाच आहे. मूळच्या पुणे शहरात याचा प्रचंड ताण आलेला आहे,त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुद्धा ओलमडली आहे. सामान्य नागरिक या सर्व बाबींमुळे त्रासून गेला आहे, या सर्व गोष्टींसाठी आणखी महानगरपालिका असणे गरजेचे आहे, अशातच आज अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नव्याने महानगरपालिका व्हाव्या या चर्चांना उधाण आलं आहे. चाकणमध्ये नगरपरिषद असून या ठिकाणी विकासाच्या विकासावर मर्यादा येत आहेत. याच बरोबर हिंजवडीतही औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला बंधने येत आहेत. यामुळे चाकण, हिंजवडीला नवीन महापालिका केल्या जाणार आहेत. याचबरोबर उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका केली जाईल.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे, आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जसे की रस्ता अंडरग्राउंड ड्रेनेज, अशा अनेक बाबी असतात, यामध्ये बँकांचे वर्ल्ड बँकचे पैसे आणता येतात, केंद्र सरकारचा निधी आणता येतो, या प्रकारे आपल्याला करावे लागेल. काहींना ते आवडेल काहींना आवडणार नाही. मात्र, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात. मी देखील काम करताना पाहिले आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या महापालिका आल्या, ठाणे महानगरपालिका एकटी होती, त्यानंतर मुंबई महानगरपालिका झाली. मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथे पूर्वीपेक्षा आता वेगाचा विकास झाला आहे, वसई विरार महानगरपालिका झाली, त्या ठिकाणी सहा सात महानगरपालिका झाल्या. तसं आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड त्यानंतर वाकवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी या सर्व भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल, फुरसुंगी, उरुळी देवाची, तो सर्व परिसर एक महानगरपालिका नदी ओलांडून इकडे आलो पिंपरी चिंचवड मधनं तर बाकीच्या भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि जो सर्व वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते, तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे. या सगळ्या भागातील लोकसंख्या किती आहे. चाकणचा प्लॅन देखील आलेला आहे. मी म्हटलं तुम्ही मंजुरी घ्या, मी एकनाथ शिंदे यांची मदत घेतो, असेही पुढे अजित पवार यांनी म्हटलं आहे
कोणत्या भागात महानगरपालिकांची शक्यता
पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे, मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची म्हणजेच हडपसरकडील या भागात एक महापालिका आणि चाकण भागात एक आणि हिंजवडी भागात एक महापालिका करावी लागणार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. यानुसार वाढलेली लोकसंख्या त्या भागातील प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका असणे गरजेचे आहे.
हिंजवडी महापालिका व्हावी का? हिंजवडीकरांनी केलं निर्णयाचं स्वागत
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयटी पार्क हिंजवडीची स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे, असे सूतोवाच केलेत. त्यानंतर अजित पवार गटाचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर मात्र संभ्रमात अडकलेत. अजित दादांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे. मात्र सात गावातील नागरिक जो निर्णय घेतील, मी त्यांच्या पाठीशी असेन. असं मांडेकर म्हणालेत. तर हिंजवडीतील ग्रामस्थांनी मात्र स्वतंत्र महापालिका झाली तर विकासाला गती येईल. असं म्हणत स्वतंत्र महापालिकेला संमती दर्शवली आहे.
सुविधा पुरविताना दमछाक
पुणे महापालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनली असली तरी कर्मचारी, अधिकारी आणि आवश्यक सोयीसुविधांची वाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकामे आणि दुरुस्तीच्या कामांवर ताण निर्माण झाला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास रखडला असून आहे. त्यामुळे सुविधांचा ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे.वाढलेल्या भौगोलिक क्षेत्रफळामुळे पायाभूत सुविधा पुरविताना महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.