पुण्याहून महाबळेश्वरला ट्रीपला निघाले, पैशांवरुन जोरदार वाद अन् ताम्हिणी घाटात रक्तरंजित थरार;
पुणे: ताम्हिणी घाटातील खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अवघ्या पाच ते सहा तासात माणगाव पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी अनिकेत वाघमारे आणि तुषार पाटोळे यांना पोलिसांनी माणगावमधून अटक (Tamhini Ghat Crime News) केली आहे. मृत गणेश भगत यांचे या दोघांशी आर्थिक व्यवहारातून (Tamhini Ghat Crime News) वाद होता. या वादातून दोघांनी गणेश याचा काटा काढल्याची माहिती पोलिसांना दिली. ११ जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ताम्हिणी घाटातील सणसवाडी परिसरात तरुणाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला होता. मृताच्या हातातील स्मार्टवॉच मधील माहितीच्या आधारे आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने माणगाव पोलिसांनी तपास करत या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.(Tamhini Ghat Crime News)
तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या गणेश भगतची मित्रांकडूनच निर्घृण हत्या करून मृतदेह सणसवाडी गावाच्या हद्दीत टाकून दिल्याची थरारक घटना उघडकीस आली,या घटनेमुळे ताम्हिणी घाट परिसरात खळबळ उडाली. पैशाच्या वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेचा माणगांव पोलिसांनी अवघ्या सहा ते आठ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.(Tamhini Ghat Crime News)
Tamhini Ghat Crime News : नेमकं काय घडलं ?
माणगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 18/2026 भा.न्या.संहिता 2023चे कलम 103(1) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 11 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉईंट परिसरात एका 25 ते 30 वयोगटातील तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला मृतकाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे घटनेचा आणि या अज्ञात तरूणासोबत काय घडलं याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. घटनास्थळी पोलीस अधिकारी व तपास पथकाने तात्काळ भेट देऊन पंचनामा केला. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रूमकडे मिसिंग व्यक्तींबाबतची सर्व माहिती मागवण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गणेश भगत (वय 22, राया रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी) या मृत ओळखीची चाचणी करत आहे (मुळा रा. सोलापूर) अशी निष्पन्न झाली. पुढील तपासात ही हत्या त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या मित्रांनीच केली असल्याचं उघड झालं. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आदित्य भगत, अनिकेत महेश वाघमारे, तुषार उर्फ सोन्या शरद पोटोळे आणि प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर हे चौघे इनोव्हा क्रिस्टा MH12 XM/9448 या वाहनातून पुण्याहून ताम्हणी घाट मार्गे महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान पैशांच्या वादातून हे सर्व घडलं. आरोपींनी भगतचा कारमध्येच दोरीने गळा आवळला. त्यानंतर सणसवाडी गावच्या हद्दीत सिक्रेट पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन कोयत्याने त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकून ते पसार झाले.
आणखी वाचा
Comments are closed.