शिवसेनेचं बंड शमलं, अर्ज मागे; एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर उतरलं; अनिकेत तटकरेंच्या विजय सोपा

रायगड : राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. कारण, येथील मतदारसंघात भाजप महायुतीमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आली असून सुनिल तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र, येथून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याशिवाय, मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांचाही या उमेदवारीला विरोध होता. मात्र, सुनिल तटकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन हा विरोध संपुष्टात आणला. त्यानंतर, आज जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरेंच्या (Aniket Tatkare) विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोकण विधान परिषद निवडणुकीतून महेंद्र दळवी यांच्या कन्या आणि अपक्ष उमेदवार असलेल्या जुईने दळवी यांनी अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळी, भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हेही हजर होते. जुईली यांच्यावतीने विघ्नेश माळी हे सूचक होते, त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला. जुईलींची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, असं विकास गोगावले यांनी सांगितलं. तर, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत विचारले असता, याबाबत मुख्यमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे विकास गोगावले यांनी म्हटले. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आज रायगड दौरा असून, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच जुईली दळवी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे, येथील मतदारसंघात अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला असलेला शिवसेना महायुतीचा विरोध मावळल्याचं पाहायला मिळालं.

अहिल्यानगरमध्ये मविआचा उमेदवार कोण?

अहिल्यानगर विधानपरिषद मतदारसंघात पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून पाचही उमेदवारांनी आपली दावेदारी कायम ठेवली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. येथे भाजप महायुतीकडून प्राजक्त तनपुरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असली तरी महाविकास आघाडीकडून कोणताही अधिकृत उमेदवार देण्यात आला नाही. या निवडणुकीत श्रीरामपूरचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज कायम ठेवला आहे. महाविकास आघाडी करण  ससाणे यांना पाठिंबा देणार की उद्या ते माघार घेणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. याशिवाय दत्तात्रय पानसरे कमलेश गांधी आणि मच्छिंद्र धुमाळ या तिघांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा

मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच ‘आऊट’

आणखी वाचा

Comments are closed.