उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रक

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊत: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या (Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance) जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिवडीमधील 3 प्रभागांवरून अडलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या सेनेला, तर एक जागा मनसेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर भांडूपच्या वॅार्ड क्रमांक 114 वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे (Shivsena UBT-MNS Alliance) या दोन्ही पक्षांना जागा हव्या आहे तिथे रस्सीखेच सुरू आहे आणि जिथे पेच निर्माण झाला आहे, तो पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सोडवला जात असून ठाकरे बंधूंचं जागावाटप जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

संजय राऊत काय काय म्हणाले? (Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance)

शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितले. युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत म्हणाले. आज रात्री युती जाहीर करायची किंवा मग उद्या, हे आत्ता ठरवू, असंही संजय राऊतांनी जाहीर केलं.

संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे- (Sanjay Raut Shivsena MNS Alliance)

1. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा वरळीमधील डोममध्ये एकत्र आले, तेव्हाच युती झाली.

2. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे.

3. आज युती जाहीर करायची की उद्या त्याचा निर्णय घेऊ.

4. नाशिक, पुणेकल्याण – डोंबिवली, ठाणेमिरा भाईंदरमधला जागा वाटपाचा विषय संपलेला आहे.

5. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीबाबत आमदार जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. ते देखील उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करताय.

6. काँग्रेसबाबतचा सध्या विषय बंद आहे, मात्र आम्ही शेवटपर्यंत बोलत राहू. काँग्रेस भाजपाला थोडी मदत करणार आहे, काँग्रेसला नगरपालिकेत यश मिळाले, त्यांचे अभिनंदन. जर पुढे जाऊन त्यांची मदत लागली तर नक्कीच घेऊ.

महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम- (Municipal Corporation Election 2026)

  1. नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  2. नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  3. उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  5. मतदान- 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

संजय राऊतांची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Municipal Corporation Election 2026: 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात; कसा असेल संपूर्ण निवडणूक कार्यक्रम, पाहा A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.