मागच्या वेळी प्रश्न सुटला, मग परत मराठा आंदोलन का हे एकनाथ शिंदेंना विचारा, राज ठाकरेंनी कात्री

मनोज जारणन पाटीलवरील राज ठाकरे: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलन चिघळताना दिसत आहे. याचदरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर होते. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांनी राज ठाकरेंना मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?, असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावर मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील, असं राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय,  एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील, असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना एकप्रकारे कात्रीतचं पकडलं आहे.

अमित शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा-

सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 1 तास बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांवर देखील अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या, ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची सह्याद्री निवासस्थानी चर्चा झाली. प्रामुख्याने ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण द्यायचं असल्यास तर कशा पद्धतीने मध्यथी करत हा प्रश्न सोडवावा, याबाबत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

https://www.youtube.com/watch?v=dj8_vt7_2yu

संबंधित बातमी:

Shreehari Aney On Maratha Reservation: मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे का?; ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे यांनी A टू Z सांगितलं!

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंचं मुंबईत आंदोलन सुरु असताना वेधलं लक्ष

आणखी वाचा

Comments are closed.