शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर…राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात

राज्यसभा निवडणूक 2026 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार: राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena Shinde Group) ऐनवेळी इच्छुकांची गर्दी (Rajya Sabha Election 2026) पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांपासून अनेक माजी खासदार इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्यात उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यसभेच्या एका जागेसाठी माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर आणि आनंद अडसूळ हे इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या गजानन किर्तीकर यांनी यंदा लोकसभेत उमेदवारी न स्विकारता रविंद्र वायकर यांना पाठिंबा दिला. सिटिंग सीट सोडल्याने गजानन किर्तीकर यांनी राज्यसभेसाठी आपला विचार करावा असा प्रस्ताव शिंदेंना दिल्याचे कळते. तर शिवसेना फूट पडल्यानंतर पक्षात शिंदेसोबत आलेल्या माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल हे पद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते शक्य न झाल्याने पक्षाने आता राज्यसभेसाठी विचार करावा अशी गळ अडसूळ यांच्याकडून एकनाथ शिंदेंना घातली गेल्याचे कळते. तर दुसरीकडे नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांनीही आज शिंदेंची नंदनवनला भेट घेऊन खासदारकीबाबत इच्छा दर्शवल्याचे समोर आले आहे. (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)

राहुल शेवाळे यादीत पहिल्या क्रमांकावर- (Rahul Shewale, Sanjay Nirupam)

काँग्रेसला सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले माजी खासदार संजय निरुपम सुद्धा पुन्हा दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्त केली असून ते सुद्धा विधानसभेत पराभूत झाल्यानंतर राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे पहिल्यादिवसापासून शिवसेने कार्यरत असलेले शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांचेही नाव या यादीत पहिले आहे. राहुल शेवाळे यांच्यावर दिल्लीतील पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईची तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. दोन्ही जबाबदाऱ्या राहुल शेवाळेंकडून व्यवस्थित हाताळल्या असल्याने त्यातच एकनाथ शिंदेंच्या ते मर्जीतले आहेत. शिवाय तरुण उच्चशिक्षित म्हणून पक्षाची राज्यसभेतील जबाबदारी ते व्यवस्थित हाताळतील हा विश्वास असल्याने राहुल शेवाळे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. याशिवाय प्रवक्त्या शायना एनसी, आणि प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचीही नावे चर्चेत आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला अनेक इच्छुकांनी मुख्यनेता एकनाथ शिंदेंना नंदनवन या शासकीय बंगल्यावर भेट घेत आपली इच्छा बोलून दाखवली.

एकनाथ शिंदे इच्छुक नेत्यांच्या गराड्यात अडकले- (Rajya Sabha Election 2026)

जागा एक, इच्छुक अनेक अशी परिस्थिती झाल्याने यातून सुवर्णमध्यकाढून कोणी नाराज होणार नाही याची काळजीही एकनाथ शिंदे घेत असल्याने राज्यसभेच्या जागेचा निर्णय घेण्यात शिंदेंना उशिर होत असल्याची चर्चा आहे. आज दिवसभर एकनाथ शिंदे इच्छुक नेत्यांच्या गराड्यात अडकल्याने विधानभवनातील अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही येऊ न शकल्याने चर्चा पक्षात जोरदार रंगली असल्याची चर्चा आहे. आता राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कुणाचे नाव पुढे देतात आणि पक्षात त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून कोणकोण इच्छुक, संपूर्ण यादी- (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)

  1. राहुल शेवाळे
  2. शायना एनसी
  3. ज्योती वाघमारे
  4. संजय निरुपम
  5. गजानन किर्तीकर
  6. आनंदराव अडसूळ
  7. हेमंत गोडसे
  8. संजय मंडलिक

संबंधित बातमी:

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.