आरसीबी चॅम्पियन झाली, पण विराटने थेट मुंबई इंडियन्सचं नाव का घेतलं? IPL 2026 ट्रॉफी जिंकल्यानंत

विराट कोहली RCB चॅम्पियन IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने क्रिकेट जगतात अशी कामगिरी करून दाखवली आहे, ज्याची त्यांचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात बंगळुरूने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक विभागात उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आणि 5 गडी राखून सामना जिंकला. या ऐतिहासिक विजयासह आरसीबीचा संघ आयपीएलच्या इतिहासात आपले विजेतेपद राखणारा तिसरा संघ ठरला आहे.

विजेतेपदानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया (Virat Kohli RCB Champion IPL 2026)

विजेतेपदानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, “मी संघातील काही खेळाडूंना म्हणालो होतो की, यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीसारखा दबाव जाणवला नाही. आजच्या सामन्यात पोरांचा संयम स्पष्टपणे दिसून आला. मध्यंतराच्या सुट्टीनंतर आम्ही काही सामने गमावले, पण आम्हाला गुणतालिकेत अव्वल स्थानी राहायचे होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) विजयाने आम्हाला मोठा आत्मविश्वास दिला. जेव्हा तुमच्याकडे असा संघ असतो, जिथे प्रत्येक वेळी तुम्हालाच संघासाठी उभे राहावे लागेल असे वाटत नाही, तो अनुभव खरोखरच अप्रतिम असतो.”

आधी गुजरात 155 धावांवर रोखले

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सला आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जकडून ठेवले. आरसीबीचा गोलंदाज रसिक सलाम याने अंतिम सामन्याच्या दबावात उत्कृष्ट कामगिरी करत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे गुजरात टायटन्सचा संघ निर्धारित 20 षटकांत 8 बाद 155 धावांवरच मर्यादित राहिला.

विराट कोहलीची मॅचविनिंग खेळी

155 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली. एका बाजूने अनुभवी फलंदाज विराट कोहलीने डाव खंबीरपणे सांभाळला. विराट कोहलीने मैदानावर संयम दाखवत नाबाद 75 धावांची खेळी केली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्याबाहेर नेले. आरसीबीने 5 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले आणि आयपीएल ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले.

हे ही वाचा –

IPL 2026 Prize Money : विजेत्या RCB वर 20 कोटींचा पाऊस, तर पराभूत गुजरातच्या वाट्याला आले फक्त…; बीसीसीआयने रिकामी केली तिजोरी, पाहा कोणाच्या खात्यात किती कोटी गेले?

आणखी वाचा

Comments are closed.