रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 फोन कॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, अंजली दमानियांनी सगळं

Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकारण्यांशी कशाप्रकारे घनिष्ट संबंध होते, याचा पुरावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणला आहे. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अशोक खरात (Ashok Kharat) याच्यासोबत कोणी कितीवेळ फोनवर बोलले आहे, याची यादी समोर आणली. या यादीमध्ये रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), जयंत पाटील, सरकारी अधिकारी अभिजित भांडे पाटील (Abhijeet Bhand Patil) यांचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics news)

अशोक खरात प्रकरणात बोलायला चालू केलं तर दिवस कमी पडतील. ⁠खरात मोठा कसा झाला, त्याला मोठं करणारे राजकारणी आणि अधिकारी आहेत. ⁠काही राजकारणी नुसते भविष्य विचारायला गेले असतील. मात्र, काही राजकारणी नक्कीच साध्य करायला गेले होते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. या यादीत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव पाहून आपल्याला दु:ख  झाल्याचेही दमानिया यांनी म्हटले.

अंजली दमानिया यांच्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात याला एकूण 177 फोन केले होते. हा सगळा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च या काळातील आहे. एका दिवशी रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात याच्यासोबत तर 22 मिनिटं संभाषण केले. त्यामुळे या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणे गरजेचे आहे. आता महिना उलटूनही रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलवण्यात आलेले नाही. मी एसआयटीकडे त्यांना चौकशीसाठी बोलवण्याची मागणी करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

Anjali Damania reveal Ashok Kharat mobile call data: अशोक खरातला फोन करणाऱ्यांच्या यादीत कोणकोण?

* नितीन पवार
* चंद्रकांत पाटील आणि पीए देशपांडे
* उदय सांगळे
* ⁠पद्मश्री पोपटराव पवार
*दादा भुसेंचे पा
* राहुल रोकडे विखे पाटील यांचे पीए
* एकनाथ शिंदे
* ⁠प्रभाकर काळे
* सुनील तटकरे
* जयंत पाटील
* रुपाली चाकणकर
* सोहम चाकणकर

* दिपक लोंढे
* ⁠बाळासाहेब बोराडे
* नंदकिशोर  काटोरे हे डॉक्टर आहेत
* ⁠सचिन चुंबाळे
* ⁠मंगेश नवाळे
* राहुल देशमुख
* अविनाश पोटे
* कमलाकर पोटे
* महेंद्र शेळके-पाटील
– ⁠तहसीलदार. जिल्हाधिकारी पोलिस अधिकारी असे अनेक अधिकारी खरातच्या संपर्कात होते

आणखी वाचा

बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?

आणखी वाचा

Comments are closed.