कैसा हराया…सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येताच नॉट रिचेबल; वडीलही गायब, फोनही घेईनात, नेमकं प्र

Sahar Shaikh Mumbra AIMIM: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील चर्चेत आलेला प्रभाग क्रमांक 30 या प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख (Sahar Shaikh) यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांच्या कैसा हराया…या डायलॉगची ठाणे, मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा रंगलेली होती. आता याच सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे. (Sahar Shaikh AIMIM) त्यानंतर आता पुन्हा एकदा नगरसेवक सहर शेख चर्चेत आल्या आहेत. त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आल्यानंतर आता सहर शेख नॅाट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

Sahar Shaikh :  सहर शेख आणि वडील युनूस शेख नॅाट रिचेबल

वडीलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सहर शेख आणि वडील युनूस शेख नॅाट रिचेबल झाले असल्याचं समोर आलं आहे. सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून MIM पक्षाच्या नगरसेविका आहेत. मात्र सहर शेख आणि त्यांचे वडील गेल्या काही दिवसांपासून मुंब्य्रात देखील नसल्याची माहिती आहे. जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणी शेख परिवाराकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सिद्दीकी फराह शबाब अहमद या तरुणीने सहर शेख यांच्याबाबत तक्रार केली होती. तक्रार करणारी ⁠सिद्दीकी फराह शबाब अहमद ही तरूणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवार होती. ⁠प्रभाग क्रमांक ३० मधूनच ती देखील उमेदवार होती.

Sahar Shaikh :  माध्यम प्रतिनिधींचे फोन घेणे टाळले

सहर शेख यांचे वडील युनूस खान यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीची अहवाल लवकरच येणार आहे. यामुळे सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस खान नॅाट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांनी माध्यम प्रतिनिधींचे फोन घेणे टाळले आहे. एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली. सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. (Sahar Shaikh AIMIM)

Sahar Shaikh :  नेमकं प्रकरण काय?

ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र  दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.  उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या.

Sahar Shaikh : नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला

ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल  करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली आहे. ठाणे तहसीलदारांना प्राप्त तक्रारीनुसार 18 मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर होते सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची कलर प्रिंट व काही कागदपत्र सादर केले. 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या. तर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेख ने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात सहर शेख आणि तिच्या वडिलांना एबीपी माझा ने संपर्क केला असता अध्याप संपर्क होऊ शकला नाही. (Sahar Shaikh AIMIM)

Who Is Sahar Shaikh? : कोण आहेत सहर शेख?

सहर शेख सध्या ठाणे महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेविका आहेत. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या होत्या. निवडणुकीवेळी सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांनी मुंब्रातील शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेत जोरदार टीका केली होती.

संबंधित बातमी:

Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?

Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया…सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.