भाजपनं भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा कायम राखली; सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीवरून संजय राऊत यांचा टोला
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा कायम राखली आणि या सातत्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, भ्रष्ट व्यक्तीला मंत्रिपदावर किंवा मुख्यमंत्रीपदावर बसवण्याची परंपरा भाजपने कायम राखली. 2014 मध्ये एक स्टिंग ऑपरेशन झाले होते आणि तृणमूल काँग्रेसच्या पाच खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आले होते. त्याच्यात सुवेंदू अधिकारी हे देखील होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि एसबीने धाडी टाकल्या. या धाडीनंतर सुवेंदू अधिकारी भाजपात सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री झाले.
ते पुढे म्हणाले की, सुवेंदू अधिकारी आजही भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये फिरत आहेत. तो डाग अजूनही स्वच्छ झालेला नाही. ते सरळ पैसे स्वीकारताना दिसत असून अशा माणसाला एका राज्याचे मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची आपली परंपरा कायम राखली. त्यांच्या या सातत्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले.
TMC चे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते.
२०१६ च्या निवडणुकीत BJP ने या व्हिडिओला प्रचंड प्रमोट केले,
पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा BJP ने आपल्या… pic.twitter.com/YQGvYYkbTC— संजय राऊत (@rautsanjay61) 9 मे 2026
Comments are closed.