काळाचा क्रूर घाला! मुलाचं आज तर मुलीचं उद्या लग्न, त्यापूर्वीच वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू, ल
बुलढाणा : मुलाचे आज आणि मुलीचे उद्या लग्न असताना एका दुर्दैवी अपघातात वडिलांचा मृत्यू (Buldhana Accident News) झाल्याची हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर दुचाकीच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर (Buldhana Accident News) कोसळला आहे. ही दुर्घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खामगाव ते नांदुरा मार्गावरील कोलासर फाट्याजवळ (Buldhana Accident News) घडली. पंढरी त्र्यंबक बगाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीची जोरदार धडक लागल्याने पंढरी बगाडे यांचा जागीच मृत्यू झाला.(Buldhana Accident News)
विशेष म्हणजे, पंढरी बगाडे यांच्या मुलाचे लग्न आज पार पडणार होते, तर मुलीचा विवाह सोहळा उद्या आयोजित करण्यात आला होता. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच अचानक झालेल्या या अपघातामुळे आनंदावर विरजण पडले आहे. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
Satara Accident: आयशर ट्रक 50 फूट खोल दरीत कोसळला, 4 जणांचा मृत्यू
तर सातारा तालुक्यातील कासरतळे या ठिकाणी आयशर ट्रक 50 फूट खोल दरीत कोसळला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला लावलेला ट्रक अचानक दरीत कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला. पुनर्वसन झाल्यामुळे घरातील सगळे साहित्य भरून ट्रक निघाला होता. ट्रकमध्ये साहित्य भरत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात आयशर ट्रक कोसळला. यामध्ये लहान मुलासह आणि 3 महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या ट्रक मधील काही पशु जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमी दोघांवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात ड्रायव्हर बचावल्याची माहिती आहे.
Amravati Accident News: धावत्या कारला अचानक भीषण आग
समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळणी फाट्याजवळ धावत्या कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली.चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबवून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच मंगरुळ दस्तगीर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघात व आगीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.