बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी करताच अशोक खरात चिडला; म्हणाला…
अशोक खरात प्रकरण: शिर्डीतील बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक व्यवहार व अवैध सावकारकी प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी त्याला पुन्हा एकदा राहाता दिवाणी न्यायालयात हजर केल जाईल. गेल्या चार दिवसांपासून शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खराची चौकशी केली. विविध कागदपत्र आर्थिक व्यवहार या संदर्भात चौकशीत अशोक खरात पूर्णपणे सहकार्य करत नसल्याच समोर आलं आहे.
शिर्डी पोलिसांनी सदर प्रकरणातील साक्षीदारांची समोरासमोर चौकशी करुन प्रश्न विचारल्यानंतर अशोक खरात चिडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मी कायदेशीर व्यवहार केला असून साक्षीदार मला मुद्दाम अडकवत असल्याचा आरोप त्याने केला. मात्र हे सगळं करताना गेल्या चार दिवसात कल्पना खरात कुठे आहे. याबाबत मात्र त्याने मौन बाळगलं. शिर्डी पोलीस त्याला आज दुपारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करतील, यावेळी पोलीस काय युक्तिवाद करतात व न्यायालय काय निर्णय देत हे पाहणं महत्त्वाचं आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)
कल्पना खरातचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश (Ashok Kharat Case)
अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी जमीन खरेदी फसवणूक व अवैध सावकारी गुन्ह्यात तपासाला वेग दिला आहे. मात्र अशोक खरात अर्धवट माहिती पोलिसांना देत असून कल्पना खरातबाबत त्याने पूर्णपणे मौन बाळगले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटी पथकाने नाशिक प्रकरणातील निदा खानाला महिनाभरात ताब्यात घेतले असले तरी गेल्या 40 दिवसांपासून फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आज या अशोक खरातची कोठडी संपणार असून आज जमीन खरेदी प्रकरणातील साक्षीदार व अशोक खरात यांची समोरासमोर चौकशी सुरू आहे.
अशोक खरातच्या अडचणीत वाढ होणार- (Ashok Kharat Case)
अशोक खरात विरोधात पुढील आठवड्यात दोषारोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल होणार आहे. अशोक खरात विरोधातील महिला अत्याचार प्रकरणाच्या 8 आणि फसवणुकीचा 1 असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. अशोक खरातच्या अटकेनंतर 60 दिवसाच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे. आतापर्यंत करण्यात आलेला तापस, गोळा करण्यात आलेले पुरावे आणि नोंदविण्यात आलेल्या जबाबच्या आधारावर दोषारोपपत्र दाखल होणार आहे.
अशोक खरातची गावात कोंबडीचोर म्हणून ओळख, VIDEO:
सबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.