VSR च्या बचावार्थ पूर्ण ताकदीने उतरलेला IT सेल बघून ‘ती खात्री’ अजून पक्की झाली…! रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

VSR कंपनीच्या विमान बुकिंगवरून सुरू असलेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. VSR कंपनीच्या बचावासाठी आयटी सेल पूर्ण ताकदीने उतरल्याचे पाहून आपली खात्री आणखी पक्की झाली, असे म्हणत रोहित पवार यांनी सरकारमधील VSR कंपनीच्या हितचिंतकांवर निशाणा साधला आहे. सरकारकडून बुक करण्यात येणाऱ्या विमानांपैकी ९० टक्क्यांहून अधिक वेळा VSR कंपनीचेच विमान बुक केले जात होते, असा दावा त्यांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे. तसेच १६८ कोटी रुपयांच्या बिलांचा आणि अजित पवार यांनी तयार केलेले टेंडर रद्द करण्याच्या निर्णयाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, VSR कंपनीच्या बचावासाठी आयटी सेल पूर्ण ताकदीने उतरल्याचे पाहून आपली खात्री आणखी पक्की झाली आहे. अजितदादांची पसंती VSR कंपनी नव्हती, तर सरकारमधील VSR च्या हितचिंतकांची पसंती होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारकडून बुक केल्या जाणाऱ्या विमानांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक वेळा VSR कंपनीचेच विमान बुक केले जात होते, असा दावा करत रोहित पवार यांनी १६८ कोटी रुपयांच्या बिलांचाही उल्लेख केला आहे. ही बिलेही याच पसंतीतून निघत होती, असा आरोप त्यांनी केला. याशिवाय अजित पवार यांनी तयार केलेले टेंडरदेखील याच कारणामुळे रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

VSR कंपनीवर एवढे प्रेम का दाखवले जात आहे? सरकारमधील या कंपनीचे हितचिंतक नेमके कोण आहेत, असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास या प्रकरणासंदर्भातील आणखी माहिती आणि पुरावे लवकरच सादर करणार असल्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

Comments are closed.