खासदारांनी आता स्वत:ची काळजी करावी; मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्यावर बोलले रविंद्र धंगेकर


पुणे : गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्यातील (Pune) जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भातील वादावर अखेर पडदा पडला आहे. गोखले बिल्डर्संकडून कोथरुड येथील जैन बोर्डिंगची जागा खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करण्याबाबत पत्र देण्यात आल्याने शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (रवींद्र धंगेकर) आणि जैन समुदायाच्या लढ्याला यश आल्याचं बोललं जात आहे. आता, या निर्णयावर रविंद्र धंगेकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी, रविंद्र धंगेकरांनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य केलंय.

अनेक लोकांनी अनेक सहकाऱ्यांनी यात पाठिंबा दिला होता, पुण्यातून अनेक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं. गोखले बिल्डर यांच्यासोबत ज्यांचे संबंध आहेत, त्यांचं नाव आता मी घेणार होतो. पण, मी आता नाव घेणार नाही, कारण शिंदे साहेबांनी मला सांगितलं आहे, अशी भूमिका जैन बोर्डिंग जागा प्रकरणात सातत्याने केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करणारे, आरोप करणारे शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी मांडली. एकनाथ शिंदे साहेबांनी काल मला सांगितलं होतं की तोडगा काढू, जे 230 कोटी गोठवले आहेत ते रुपये संस्थेला द्या. योग्य माणसाची निवड यावर करावी, संस्था पुन्हा उभा करण्यासाठी मदत करा. हा धर्म दानशूर आहे, मी समाजाला शब्द दिला होता तो आज खरा होत आहे. सगळ्यांचा मी आभारी आहे की, तुम्ही सगळ्यांनी ही संस्था वाचवायला मदत केली, असेही धंगेकर यांनी व्यवहार रद्द झाल्यानंतर पहिली प्रतक्रिया देताना म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. कारण, त्यांनी मला रोखलं नाही, माझ्यावर कारवाई केली नाही. मी विकृतीच्या विरोधात बोलत राहील, एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो की मला अडवलं नाही. पण, सांगितलं होतं की महायुतीमधल्या पक्षांवर बोलू नका, असेही धंगेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. माझा लढा संपला नाही, घायवळवर अजून बोलणार आहे. तो कसा पळून गेला, त्यावर पण बोलेन, माझा लढा सुरूच आहे, असे धंगेकर यांनी म्हटलं. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो, यात कोण गुन्हेगार होते, कोण दोषी होते, त्यांना शिक्षा व्हावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे

खासदारांनी स्वत:ची काळजी करावी – धंगेकर

महाराजांनी सांगितलं तसं 1 तारखेला आंदोलन करेल. मला तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली म्हणून आज संस्था समाजाला परत मिळत आहे. तुमच्यामुळ हा आवाज दिल्लीत गेला, आता कुणी पुढाकार घेऊ नका. घेणाऱ्याने पुढाकार घेतला. आता खासदार साहेबांनी त्यांची स्वतःची काळजी करावी, पुढे काय होणार आहे ते. त्यांनी 4 हजार कोटी रुपयांचं स्वप्न बघितलं होतं. आता, ते धुळीस मिळेल. चुकीचे लोकं कुठल्याही पक्षात असू द्या, मी लढा देणार. आता माझा मोर्चा लोकमान्य नगरमध्ये वळवणार आहे. निलेश घायवळवर बोलणार आहे, ज्यांना खुमखुमी आहे त्यांना विनंती आहे की, आता माझ्याशी लढाच. मी तयार आहेच. सगळे विषय काढू, लढत राहू. मोहोळ यांच्याशी माझी लढाई आहे, त्यांच्या कुटुंबाशी नाही मंदिर आता वाचलं आहे, मी जिलेबी काढून वाटणार असे म्हणत मोहोळ यांच्या राजीनामावर दोन दिवसांनी बोलू, असेही रविंद्र धंगेकर यांनी म्हटले.

1 तारखेला आंदोलनास बसणार – धंगेकर

आचार्य गुप्तीनंद महाराज यांचे रवींद्र धंगेकर यांना आशीर्वाद आहेत. एकत्र आंदोलन करूया, महाराज यांचे रवींद्र धंगेकर यांना सांगणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याठिकाणी यावं, असं देखील महाराजांचे मत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले. मिडिया ने हा विषय घराघरापर्यंत नेला, तुम्ही जी जनक्रांती करत आहात, त्यात समतोल ठेवा. 1 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला तर तुम्ही आंदोलनाला बसा महाराज यांचे रविंद्र धंगेकर यांना आवाहन.

हेही वाचा

पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; मुरलीधर मोहोळांवरही स्पष्टच बोलले

आणखी वाचा

Comments are closed.