मोठी बातमी: राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार; राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश, विजयी नग

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026: महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकींसाठी (Maharashtra Municipal Corporation Election 2026) मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी आहेत. मात्र, या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

केडीएमसीत भाजपचे 14 व शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार, तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथे किमान एक भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. कुलाबातील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल (एस) व आपचे उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे. आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त व वॉर्ड ‘ए’ कार्यालयातील CCTV फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद नाही. 2 जानेवारी (नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख) नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील. (State Election Commission Municipal Corporation Election 2026)

भाजपाचे ४५ उमेदवार विजयी- (भाजप ४५ नगरसेवक बिनविरोध)

निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली अजून आतापर्यत भाजपाचे 45 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल 19 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक 15 उमेदवार तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार बिनविरोध झाले, याची संपूर्ण यादीही समोर आली आहे.

एकूण बिनविरोध उमेदवार – 67 (Municipal Corporation Election 2026)

भाजप – 45
शिवसेना शिंदे गट- 19
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 2
इतर- 1

बिनविरोध उमेदवारांची यादी- (Binvirodh Candidate List Municipal Corporation Election 2026)

1. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी

2. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपच्या आसावरी नवरे

3. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपच्या रंजना पेणकर

4. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपच्या ज्योती पाटील

5. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपच्या मंदा पाटील

6. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे

7. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे

8. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ क मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या वृषाली जोशी

9. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोरे

10. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २६ अ मधून भाजपचे मुकुंद पेडणेकर

11. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ ड मधून भाजपचे महेश पाटील

12. कल्याण-डोंबिवली – प्रभाग १९ क मधून भाजपचे साई शेलार

13. कल्याण-डोंबिवली – प्रभाग ११ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या रेश्मा निचळ

14. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती मराठे

15. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २३ क मधून भाजपच्या हर्षदा भोईर

16. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २३ अ मधून भाजपचा दीपेश म्हात्रे

17. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २३ ड मधून भाजपचा जयेश म्हात्रे

18. कल्याण-डोंबिवली – प्रभाग ३० अ मधून भाजपच्या रविना माळी

19. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २५ ड मधून भाजपचे मंदार हळबे

20. कल्याण- डोंबिवली- प्रभाग 19 ब मधून भाजपच्या डॉ.सुनिता पाटील

21. कल्याण- डोंबिवली- प्रभाग 19 अ भाजपच्या पूजा म्हात्रे

22. पनवेल – वॉर्ड क्र १८ ब मधून भाजपचे नितिन पाटील

23. पनवेल – प्रभाग १८ ब मधून भाजपचे नितिन पाटील

24. पनवेल – प्रभाग १९ ब मधून भाजपच्या रूचिरा लोंढे

25. पनवेल – प्रभाग २० अ मधून भाजपच्या अजय बहिरा

26. पनवेल – प्रभाग १९ अ मधून भाजपच्या दर्शना भोईर

27. पनवेल – प्रभाग २० ब मधून भाजपच्या प्रियांका कांडपिळे

28. पनवेल – प्रभाग १८ अ मधून भाजपच्या ममता म्हात्रे

29. पनवेल – प्रभाग १८ क मधून भाजपच्या स्नेहल ढमाले

30. ठाणे – प्रभाग १८ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या जयश्री फाटक

31. ठाणे – प्रभाग १८ क मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या सुखदा मोरे

32. ठाणे – प्रभाग १७ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या एकता भोईर

33. ठाणे – प्रभाग १८ ड मधून शिंदेच्या शिवसेनेचे राम रेपाळे

34. ठाणे – प्रभाग १४ अ शिंदेंच्या शिवसेनेच्या शीतल ढमाले

35. ठाणे – शिंदेंच्या शिवसेनेचे जयश्री डेव्हिड

३६. ठाणे – प्रभाग ५ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या सुलेखा चव्हाण

37. भिवंडी – प्रभाग १७ अ मधून भाजपचे सुमित पाटील

38. भिवंडी – प्रभाग १६ अ मधून भाजपचे परेश चौगुले

39. भिवंडी – प्रभाग १८ ब मधून भाजपच्या दीपा मढवी

40. भिवंडी – प्रभाग १८ अ मधून भाजपच्या अश्विनी फुटाणकर

41. भिवंडी – प्रभाग १८ क मधून भाजपचा अबू साद लल्लन

42. भिवंडी – प्रभाग २३ ब मधून भाजपच्या भारती चौधरी

43. धुळे – वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले

44. धुळे – प्रभाग ६ ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील

45. धुळे – प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले़

46. अहिल्यानगर – प्रभाग ८ ड मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे

47. अहिल्यानगर – प्रभाग १४ अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे

48. अहिल्यानगर – प्रभाग 7 ब मधून भाजपचे अनिल बोरूडे

49. अहिल्यानगर- भाजप( प्रभाग 2 ड) मधून करण कराळे

50. अहिल्यानगर- भाजप (प्रभाग 2 ब) मधून सोनाबाई शिंदे

51. जळगाव – प्रभाग ९ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख

52. जळगाव – प्रभाग ७ अ मधून भाजपचे विशाल भोळे

53. जळगाव – प्रभाग ७ अ मधून भाजपच्या दीपमाला काळे

54. जळगाव – प्रभाग १६ अ मधून भाजपच्या डॉ वीरेन खडके

55. जळगाव – भाजपच्या वैशाली पाटील

56. जळगाव – भाजपच्या अंकिता पाटील

57. जळगाव – शिंदेंच्या शिवसेनेच्या रेखा पाटील

58. जळगाव – शिंदेंच्या शिवसेनेचे विक्रम सोनवणे

59. जळगाव – शिंदेंच्या शिवसेनेचे मनोज चौधरी

60. जळगाव – शिंदेंच्या शिवसेनेचे सागर सोनवणे

61. जळगाव – प्रभाग १२ ब मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे

६२. जळगाव – प्रभाग १८ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे

63. पुणे – प्रभाग ३५ मधून भाजपच्या मंजुषा नागपुरे

६४. पुणे – प्रभाग ३५ ड मधून भाजपचे श्रीकांत जगताप

65. पिंपरी-चिंचवड – प्रभाग ६ ब मधून भाजपचे रवी लांडगे

66. पिंपरी-चिंचवड – प्रभाग १० ब मधून भाजप सुप्रिया चांदगुडे

67. मालेगाव – वॉर्ड ६ क मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Municipal Corporation Election 2026: राज्यात मतदानापूर्वीच 67 उमेदवार विजयी; भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक, शिंदेच्या शिवसेनेनेही मारली बाजी, कोणाचे किती नगरसेवक विजयी?, A टू Z माहिती

Comments are closed.