आमच्या पक्ष नेतृत्वानं आत्मपरिक्षण करावं; सचिन अहिरांनंतर ठाकरेंचा आणखी एक आमदार नाराज?
मुंबई : शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. विधान परिषदेतील उपसभापती पदाच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी अर्ज भरला आहे. सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांचं धक्का बसला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेतय अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं होतं, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले आमदार सुनील शिंदे?
आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं होतं. कारण सचिन अहिर यांचं ज्या पद्धतीने चाललं होतं, त्याबाबत मला कल्पना आली होती. परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे यावर भाष्य करु शकत नव्हतो असे मत सुनील शिंदे यांनी व्यक्त केले.
सचिन अहिर हे ओरीजनल आमच्या पक्षातील नव्हते. शरद पवार यांच्या किचन कॅबिनेटमधील म्हणून त्यांना संबोधलं जायचं ते त्यांचे नाही झालं तर आमच्या पक्षाचे कसे एकनिष्ठ राहू शकतात? असा सवाल शिंदे यांनी अहिर यांना टोला लगावला. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं होतं. त्यांचे ज्या पद्धतीने चालले होते हे माझ्या लक्षात आले होते. पण मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळं मला याविषयी बोलता आलं नसल्याचे सुनिल शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि सचिन अहिर थेट शिंदे गटात
मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर हे पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असा आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर तातडीने शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती आहे. वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केला आहे शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का वरळी मतदारसंघाचा विचार केला तर पाहायला मिळतोय. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी देखील एक खळबळजनक माहिती दिली आहे. ठाकरेंचे खासदार फोडताना देखील सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचं नाही तर एकनाथ शिंदेंचे काम करत होते. त्याचं बक्षिस एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच भविष्यात ठाकरेंचं 12 पेक्षा जास्त आमदार फुटतील, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे.(Sachin Ahir Join Shinde Group Latest Marathi News)
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.