Sushil kedia: मराठीत प्रश्न विचारताच चर्चेतून पळाला;राज ठाकरेंना डिवचणारा सुशील केडिया कोण?

मुंबई : मराठी विषयाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उद्या मुंबईत एकत्रित मेळावा पार पडत असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असून संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्त्यांनी या मेळाव्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातच, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भायंदर येथे एका स्वीट मार्ट मालकाला मारहाण केल्याने वाद निर्माण झाला असून व्यापाऱ्यांनी एकत्र येत मनसेच्या (MNS) दडपशाहीला विरोध दर्शवला आहे. तर, दुसरीकडे शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी ट्विट करुन राज ठाकरेंना डिवचलं होतं. मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी (Marathi) येत नाही, बोल क्या करना है, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर, एबीपी माझावर आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या केडिया यांनी मराठीत प्रश्न विचारताच पळ काढला.

सुशील केडिया यांनी आपली बाजू मांडण्यासाठी हिंदीत संवाद साधण्याची मागणी केली होती. त्यानुसार, एबीपी माझावर हिंदी, मराठी असा संवाद सुरू असताना सुशील केडियाने चर्चेतून पळ काढला. तुम्ही माझी फसवणूक केली आहे, मी केवळ हिंदी किंवा इंग्रजीत चर्चा होणार असेल तर सहभागी होणार होते, असे म्हणत त्यांनी आपला कॅमेरा बंद केल्याचं पाहायला मिळत आहे.

सुशील केडिया कोन?

सुशील केडिया हे नाव शेअर मार्केटशी निगडीत असून ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील ‘केडियोनॉमिक्स’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. सेबी (SEBI) नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार अशी त्यांची फर्म आहे. शेअर बाजारातील अनुभवामुळे ते अनेकदा विविध आर्थिक वृत्तवाहिन्यांवर विश्लेषक म्हणून भूमिका बजावतात, बाजू मांडतात. केडिया यांनी 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँका तसेच दोन मोठ्या हेज फंडांमध्ये काम केले आहे. सुशील केडिया यांच्याकडे असलेल्या 45 कंपन्यांमधील शेअर्सचे जून 2025 पर्यंतचे एकूण मूल्य 3,103 कोटींहून अधिक आहे.

https://www.youtube.com/watch?v=PVH6ID01DYQ

ट्विट करुन काय म्हणाले सुशील केडिया

उद्योजक आणि गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी ट्विट करुन थेट राज ठाकरेंनाच डिवचलं आहे. ”राज ठाकरे हे लक्षात ठेवा, मी गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल?” असा थेट सवालही सुशील केडिया यांनी थेट राज ठाकरेंना केला आहे.

केडियाचं वक्तव्य चुकीचं – मुख्यमंत्री

दरम्यान, सुशील केडिया आणि मनसे वादावरही मुख्यमंत्र्‍यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी येत नसेल तर ठीक, पण तरी मराठी येत नाही, मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणं चुकीचं नाही का? याचं समर्थन कसं होऊ शकतं, असे म्हणत केडियांना फटकारले.

अंबादास दानवेंचा केडियाला इशारा

हा केडीया नाही, कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसाने सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं. तसेच,  …आणि हो, केडीया! या मग्रूरीचे उत्तर जरूर मिळेल, असे म्हणत केडियाला इशाराही दिला आहे.

हेही वाचा

Video: अर्धवट शारीरिक संबंधाने बिनसलं, कुरिअरवाला नव्हे तर बॉयफ्रेंडच; कोंढवा प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

आणखी वाचा

Comments are closed.