Video: ठाकरे एकत्र, कंठ दाटला, डोळे पाणावले; अनिल परब, बाळा नांदगावकरांना बाळासाहेब आठवले

मुंबई : राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी (Marathi) माणसांसाठी आणि शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक आणि अभिमान वाटावा असा आजचा क्षण होता. मुंबईतील (Mumbai) वरळी डोम येथे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा विजयी जल्लोष सोहळा ग्रँड झाला. ठाकरे ब्रँडचा ग्रँड सोहळा पाहून अनेकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण झाली. तर, मनसेच्या स्थापनेअगोदर शिवसैनिक असलेल्या मनसेच्या नेत्यांनी देखील आजच्या क्षणावर भावुक होत प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंचे खास आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना आमदार अनिल पॅराबसुधीर साळवी आणि किशोरी पेडणेकर यांचे डोळे पाणावले होते.

आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण आहे. मराठी माणसाठी भावुक क्षण आहे, हा भावुक क्षण आणि सण आहे. मराठी माणसाची एकजुट यापुढे कायम राहिल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांनी दिली. यावेळी, ते भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. ज्या महाराष्ट्रात माझा जन्म, त्या मराठी भाषेचा सन्मान माझ्यासाठी प्राथमिक राहिल. मी लहानपणापासून शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. ज्यांना बाळासाहेबांनी एकत्र केलं, ज्या पठडीत आम्हाला तयार केलं, त्यांच्यासाठी हा क्षण महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली.  विशेष म्हणजे, मुंबईतील ह्या सोहळ्यात ठाकरे बंधूंना एकत्र पाहून अनिल परब यांच्यासह मनसेचे बाळा नांदगावकर, शिवसेनेचे सुधीर साळवी ह्यांनाही अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांची आठवण काढत अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

पाण्यावर काठी मारल्याने पाणी वेगळं होत नाही

हा एकदम आनंदाचा क्षण आहे, ह्या आनंदाच्या क्षणात आम्ही ताकदीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत आहोत. आमच्या वागण्या बोलण्यातच हा आनंद दिसून येत आहे, शिवसैनिक व मनसैनिकांसाठी हा अतिउच्च क्षण आहे. पाण्यावर काठी मारली तरी पाणी वेगळं होत नाही, जे रक्त राज साहेबांच्या धमन्यांमध्ये वाहते, तेच उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये वाहते. 1993 मध्ये जे घडलं, तेव्हा सगळे मराठीच मदतीसाठी उतरले होते, त्यामुळे आज मराठीसह मुंबईतील सर्वांनाच आनंद झाला आहे, असेही पेडणेकर यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=uulpiorba4q

दरम्यान, या मेळाव्याच्या निमित्ताने वरळीत हजारो शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले होते, मनसे व शिवसेनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी देखील आनंदत व्यक्त केला. तर, कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही ठाकरे बंधूंच्या एकीचा आनंद क्षण स्पष्टपणे झळकत होता.

https://www.youtube.com/watch?v=6vvpihn8S3g

हेही वाचा

ब्रँड ठाकरेंच्या ग्रँड सोहळ्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; जाहीरपणे दिलगिरी

आणखी वाचा

Comments are closed.